जे. एम. म्हात्रे कंपनीच्या पालखी महामार्गावरील अतिरिक्त पुलाच्या कामाने वाहतूक व्यवस्था सुरळीत चालून भाविकांची अडचण दूर होणार…
माळशिरस ( बारामती झटका )
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील माळशिरस नगरपंचायत हद्दीतील ६१ फाटा या ठिकाणी जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अतिरिक कॅनलवर पुल तयार केलेला असल्याचे कार्य कौतुकास्पद आहे. जे. एम. म्हात्रे कंपनीच्या अतिरिक्त कॅनलवरील पुलाच्या कामाने वाहतूक व्यवस्था सुरळीत चालून भाविकांची अडचण दूर करून वैष्णवांची सेवा केलेली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी वारी पालखी सोहळ्याचा दुसरा मुक्काम माळशिरस येथे असतो. मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी पानीव पाटी या ठिकाणी माऊलींच्या अश्वांचे गोल रिंगण असते. त्यामुळे पानीव पाटी खुडूस ते माळशिरस दरम्यान दोन दिवस भाविकांची गर्दी राहते. ६१ फाटा या ठिकाणी कॅनलला पाणी असल्यामुळे वारकरी व भाविकांचे पाण्यामुळे वाहन, कपडे स्वच्छ करण्याचे काम सुरू असते. ६१ फाट्यावरील पूल अरुंद असल्याने नेहमी वर्दळीमुळे वाहतूक खोळंबत असते.

श्री संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते खुडूस दरम्यान जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. प्रोजेक्ट डायरेक्टर अरुणशेठ म्हात्रे, जनरल मॅनेजर सुब्रमण्यम, व्यवस्थापक मॅनेजर दीपकसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. उड्डाणपूल व्यतिरिक्त महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पालखी महामार्गावरील अडथळे दूर करण्याकरिता सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव, माळशिरस बायपास, डोंबाळवाडी, खुडूस अशा गावांमध्ये जे. एम. म्हात्रे कंपनीला सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. ६१ फाट्यावरील वाहतुकीचा ताण व भाविकांना होणारी अडचण दूर करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त तात्पुरत्या पुलाची उभारणी कंपनीने करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांची सेवा केलेली आहे. यामुळे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जे. एम. म्हात्रे कंपनीच्या कार्याचे कौतुक करतील, यात शंकानाही. यामुळे ६१ फाटा या ठिकाणी आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे दिसत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng