माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते खुडूस हद्दीतील पालखी महामार्गाची व पालखीतळ, विसावा व रिंगण सोहळा जागेची केली पाहणी.
माळशिरस ( बारामती झटका )
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा माळशिरस तालुक्यात जुलै चार पाच सहा तारखेला येत असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संस्थांचे प्रमुख श्री. बाळासाहेब चोपदार यांनी माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते खुडूस पर्यंत पालखी महामार्ग कामाची पाहणी, पालखी मुक्कामाचा तळ, पालखी विसावा आणि रिंगण सोहळा अशा सर्व ठिकाणाची पाहणी केली. यावेळी माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, मॅनेजर ज्ञानेश्वर वीर, कार्यकारी अभियंता उप अभियंता, जे. एल. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरचे् जनरल मॅनेजर दीपक पाटणकर यांच्यासह विविध गावचे सरपंच व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षापासून पायी जाणारा पालखी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संसर्ग रोग पसरू नये यासाठी ठराविक दिंड्यांचे मानकरी व पालखी सोहळ्यातील प्रमुख यांच्या उपस्थितीत दोन वर्ष शिवनेरी बसमधून आयोजित केलेला होता. दरम्यानच्या काळामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे विस्तारीकरण सुरू केलेले होते. महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपूल व पुलांची कामे सुरू आहेत. पालखी महामार्गाचे पूर्ण झालेले काम दर्जेदार झालेले असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख बाळासाहेब चोपदार यांनी समाधान व्यक्त केले. काही ठिकाणी वारकरी व वाहनांना अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. जे. एल. म्हात्रे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर दीपक पाटणकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी संस्थांचे प्रमुख बाळासाहेब चोपदार व इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng