श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील माळशिरस हद्दीत महावितरण कंपनीचे काम अंतिम टप्प्यात…

महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता युद्ध पातळीवर काम सुरू…

माळशिरस ( बारामती झटका )

श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातून अनेक संतांच्या पालख्या पायी चालत येत असतात. सर्वात जास्त भाविकांचा जनसमुदाय असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायीवारी सोबत भाविकांची प्रचंड गर्दी असते. पायी वारीचा मुक्काम, सकाळी न्याहारी, दुपारचे जेवण असे ठरलेले असते. अशावेळी पालखी सोबत व पालखीमधील संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरिता आसपासच्या गावातील भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांची अडचण होऊ नये, यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, वनविभाग, महावितरण कंपनी पालखी महामार्गावरील अडचणी दूर करीत असतात.

माळशिरस शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. त्यामुळे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता श्री. संतोष रजपूत यांनी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता युद्धपातळीवर लाईटचे काम सुरू केलेले आहे. अनेक ठिकाणी तारांमध्ये वाढलेली झाडे, तारामधील अंतर, काही डांब मोडलेले वाकलेले यांची कामे महावितरण कंपनीने अंतिम टप्प्यात आणलेली आहेत.

माळशिरस विभागातील लाईटमन संतोष पवार व त्यांचे सहकारी मनोज चव्हाण, लखन काळे, प्रशांत भोसले, अजय पोळ, माळवे, गणेश इंगोले, अमृता गिरमे आदी कर्मचारी यांनी वेळेचा विचार न करता पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आणलेले आहे. झाडांच्या फांद्या व वाढलेली झाडे काढत असताना अनेकवेळा लाईटचे डांब मोडत असतात, अशावेळी सर्वसामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा कठीण परिस्थितीतून वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पालखी महामार्गावरील लाईटचे काम अंतिम टप्प्यात आणले असून महावितरण कंपनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleइक्विटस स्मॉल फायनान्स बँकेची चौकशी करून कारवाई करा, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांची मागणी
Next articleविश्रांतवाडी येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागतासाठी स्वराज्य संघटनेच्यावतीने युवराज छत्रपती संभाजीराजे समवेत महेश डोंगरे उपस्थित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here