बारामती (बारामती झटका)
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आमदार संजय जगताप, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, एकात्मिक विकास पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन शैलेश रासकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.पवार म्हणाले, श्री सोमेश्वर कारखान्याने मागील वर्षी सभासदांना उच्चांकी भाव दिला आहे. यावर्षीचा हंगामही चांगला होईल यात शंका नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाचे चिज होण्यासाठी त्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. जागतिक बाजारपेठेत साखरेची मागणी वाढत आहे त्यामुळे साखरेला चांगला भाव मिळेल. धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने कॅनलला पाणी राहिल याची दक्षता घेण्यात येईल. सोमेश्वरनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि क्रिडा संकुलला मंजूरी देण्यात आली असून त्याचा लाभ परिसराला होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng