संग्रामनगर येथे साई प्राणप्रतिष्ठापनाचा वर्धापन दिन व श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांची विशेष उपस्थिती.

अकलूज (बारामती झटका)

दोन वर्षाच्या कालावधीनंतर श्री साईबाबा सेवा ट्रस्ट संग्राम नगर अकलूज येथे श्री साई प्राणप्रतिष्ठा तेविसावा वर्धापन दिन व श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी साई बाबांच्या मुर्तीस महाअभिषेक करण्यात येऊन दुपारी बारा वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते श्री साईबाबांची महाआरती व राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी संग्रामनगरचे सरपंच कमालभाई शेख, माजी सरपंच श्रीराज नंदकुमार माने पाटील, सौ. राजवर्धीनीदेवी माने पाटील, क्रांतिसिंह माने पाटील, युगंधरादेवी माने पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, हिंदुराव माने पाटील आदी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष किशोरसिंह माने पाटील यांनी केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सराटी ता. इंदापूर येथील ओम साई ट्रॅव्हल्सचे आप्पासाहेब पवार व सोनाली पवार यांनी अन्नदानासाठी मदत केली. त्यांच्याच हस्ते सकाळी विश्वशांती यज्ञाचे प्रज्वलन करण्यात आले.

सायंकाळी सात वाजताची आरती जिल्हा परिषद सदस्या डॉटर मॉम्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आ. राम सातपुते उपस्थित होते. तब्बल दोन वर्षाच्या कालावधीनंतर श्री साईबाबा ट्रस्टच्या वतीने हा मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. ट्रस्टचे अध्यक्ष किशोरसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध असा हा राम जन्मोत्सव संपन्न झाला‌.

यावेळी सर्वश्री सदस्य चंद्रकांत कुंभार, राजेंद्र आवेॕ, देवचंद ओसवाल, अरुण राऊत, अशोक गुजर, अजित राखले, शंकर काळे, जयंत कुलकर्णी, अजित माने, आदेश शहा त्याचबरोबर लोकमान्य गणेश मंडळ, शिवरत्न गणेश मंडळ, स्वामी विवेकानंद तरुण मंडळ, शिवशंभो भजनी मंडळ, शिवगर्जना ग्रुप, ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ माळीनगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि.सौ.कां. ऐश्वर्या ठवरे पाटील आणि चिरंजीव अभिजीत हाके यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.
Next articleनवी मुंबईत आज लॉटरी सोडत, मंत्रालयातल्या लॉटरी केंद्राला उपमुख्यमंत्र्यांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here