संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाला सदिच्छा भेट

अकलूज (बारामती झटका)

वेळापूर ता. माळशिरस येथील शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. वेळापूर येथील श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टच्या जागेत श्री अर्धनारीनटेश्वर महाविद्यालय उभारणार आहे. हे महाविद्यालय तालुक्याच्या दक्षिण भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व मंडळाचे माजी अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टच्या जागेत महाविद्यालयासाठी अद्ययावत इमारत बांधण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने या जागेची पाहणी मंडळाचे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी केली.

या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह माने देशमुख व सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश साळुंखे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय माने, विरकुमार दोशी, तुकाराम जगदाळे, आस्लम शेख, महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य दादा साठे, प्रा. बिटू मोलाणे-भोसले, प्रा. मनोज नांगरे, प्रा. अभिजीत घाडगे, प्रा. आशा गायकवाड, प्रा. उर्मिला कोडग, राजेंद्र बामने, रविंद्र साळुंखे इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वेळापूर परिसरात महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू होत आहे, त्याची पाहणी करून संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी काही मौलिक सूचनाही केल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायत प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजप व अपक्ष उमेदवार आमनेसामने.
Next articleराष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख तुकाराम देशमुख यांना वार्ड क्रमांक चार मधील मतदारांचा वाढता पाठींबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here