संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन.

अकलूज (बारामती झटका )

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकलूज येथील शिवनिर्णय संघटना व शेटे मॅटरनिटी होम यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवनिर्णय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्कर्ष शेटे यांनी दिली.यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ.वैष्णवी शेटे यांनी माहिती देताना सांगितलं, स्त्रीचं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तरच कुटूंबाचा पर्यायाने समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. धावपळीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. स्त्रीच शारीरिक आरोग्य जपण्यासाठी सर्वात महत्वाचे शरीरातील रक्ताचं योग्य प्रमाण असणं हे होय.

याकरिता मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, मोफत औषधउपचार करण्यात येणार आहेत.
सदर शिबीर रविवारी दि.26डिसेंबर 2021रोजी सकाळी 10-30वाजता डॉक्टर विनोद शेटे यांच्या शुभहस्ते अकलूज येथील चांगोजीराव देशमुख सभागृह, अकलूज नगरपरिषद, विठ्ठल चौक अकलूज येथे आयोजित करण्यात आले असून, या शिबिरासाठी डॉक्टर वैष्णवी शेटे, महादेव पाटील, संदीप नरुळे, आकाश कापसे, उमेश गुळवे, प्रथमेश उरवणे, जालिंदर लिगाडे, देविदास राजमाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अकलूज आणि परिसरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा.https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादी महिला काँग्रेस माळशिरस तालुक्याच्या निवडी
Next articleची.सौ. का. वृषाली काळे आणि चिरंजीव निलेश गलंडे यांच्या शुभविवाहाचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here