माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घोडदौड सुरू…
उघडेवाडी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी भवानीनगर, उघडेवाडी सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी श्री. रवींद्रकाका विठ्ठलराव घोरपडे तर व्हाईस चेअरमनपदी श्रीमती कमल खंडेराव कदम यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
संग्रामसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची घोडदौड महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्या कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज चालत असते.

संस्थेची आर्थिक उलाढाल सत्तर लाख रुपये आहे. एकूण सभासद संख्या 320 आहे. सन 2021-22 ते 2026-27 सालाकरिता पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे. संचालक पदी श्री. नितीन चौगुले, तुकाराम मोहिते, यशवंतराव माने देशमुख, नारायणराव माने देशमुख, श्रीमंत पवार, शिवाजी भगत, आजिनाथ उपासे, चांगदेव साठे, महादेव कोळेकर, अन्सार मुलाणी, सौ. शोभा जगदाळे यांची निवड बिनविरोध झाली.
सहाय्यक निबंधक संस्था कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अविनाश कांबळे यांनी कामकाज पाहिले. निवडीसाठी सहकार्य संस्थेचे सचिव श्री. माळवदकर भाऊसाहेब व क्लार्क श्री. रत्नाकर जवळेकर यांचे लाभले.
यावेळी सर्वांचा सत्कार ज्येष्ठ नेते श्री. पांडूरंग कदम, भजनदास बाळापुरे, हनुमंत कदम, सदाशिव कोडग यांच्या हस्ते करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng