खंडकरी शेतकरी नेते सोमनाथआण्णा वाघमोडे, माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील, बाजीराव माने पाटील, रमेश पाटील, सोमनाथ पिसे, विकास देशमुख आदींनी दिल्या शुभेच्छा

सदाशिवनगर ( बारामती झटका )
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष संघर्षनायक भानुदास सालगुडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरा निवासस्थानी मित्र परिवाराच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी लोणंद पंढरपूर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील, उद्योगपती बाजीनाना माने पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे, इस्लामपूरचे युवानेते विकास देशमुख आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांचा संघर्ष उभा करून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी लढा उभा करणारे संघर्ष नायक भानुदास सालगुडे पाटील यांचा आज 1 ऑक्टोंबर या दिवशी वाढदिवस असतो. या अभिष्टचिंतननिमित्त अनेक स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या सदाशिवनगर येथील इंदिरा निवास याठिकाणी मित्र परिवाराच्या वतीने सन्मान संपन्न झाला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng