संघर्ष योद्धा “आपला माणूस” आ. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांक प्रकाशित होणार

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या जीवनपटाचा परामर्श घेणारा विशेषांक प्रकाशित होणार

आई-वडिलांचे संस्कार, गरिबीशी, आर्थिक परिस्थितीशी सामना करीत विद्यार्थी दशेत संघर्ष करून प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करणाऱ्या संघर्ष योद्धाचा जीवनपट उलगडणारा विशेषांक प्रकाशित होत आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तुत्वाने आई-वडिलांचे संस्कार घेऊन गरिबीशी, आर्थिक परिस्थितीशी सामना करत विद्यार्थी दशेत संघर्ष करून प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करणाऱ्या संघर्ष योद्धाचा जीवनपट उलगडणारा “आपला माणूस” विशेषांक वाढदिवसानिमित्त प्रकाशित होणार आहे.

आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची व बेताची, ऊसतोड मजूरी करून उदरनिर्वाह सुरू होता. अशा कठीण परिस्थितीत आई-वडिलांचे संस्कार घेऊन आमदार राम सातपुते यांनी जिद्द, चिकाटी, विश्वास, निष्ठा, वरिष्ठ नेत्यांचा आदर व पक्षाशी एकनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत विद्यार्थी दशेतच संघर्षाला सुरुवात करून माळशिरस विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे‌. मिळालेल्या संधीचे सोने करून अडीच ते तीन वर्षांमध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघात सुसंस्कृत स्वभाव व जनतेच्या कार्यातून आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे‌. कार्यातून व वर्तणुकीतून समाजामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. आपलेपणा व कृतज्ञता व्यक्त करण्याकरता वाढदिवसानिमित्त संघर्ष योद्धा “आपला माणूस” विशेषांक प्रसारित करण्याचा मनोदय आहे.

तरी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याविषयी कार्यातून व सहवासातून आलेल्या अनुभवाचे आपण बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याकडे व्हाट्सअप मोबाईल नंबर 9850104914, 9766703514, 9130103214, या नंबर वर किंवा [email protected] या मेलवर अथवा मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर पिन कोड 413 113 या तीन पैकी आपणास सोयीस्कर होईल अशा पद्धतीने आपले लिखाण दि. 14 जानेवारी 2023 पर्यंत पोहोचतील, अशा पद्धतीने पाठवावेत उशिरा आलेल्या लिखाणाचा विचार केला जाणार नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleAnti-Malware Blog
Next articleबाळासाहेबांची शिवसेना ग्रामपंचायत निवडणुकीत अस्तित्व दाखवणार – शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here