संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे आदिनाथ कारखान्याचे नुकसान, बचाव समितीचा आरोप

करमाळा (बारामती झटका)

सहकारी साखर कारखान्याच्या एक ते पंचवीस किलोमीटर अंतरावर एक लाख मॅट्रिक टन ऊस असून या ऊस वाहतुकीसाठी प्रति टन 25 किलोमीटर अंतराच्या दराने वाहतूक दिली तर जवळपास एक लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळप आदिनाथचे अजून होऊ शकते. मात्र, जाणीवपूर्वक आदिनाथ कारखाना अडचणीत आणायचे ही भूमिका अजूनही संचालक मंडळ सोडत नसून संचालक मंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिनाथ पुन्हा नुकसानीत जाईल का, अशी भीती निर्माण झाली आहे, असा आरोप बचाव समितीचे निमंत्रक हरिदास डांगे व अध्यक्ष महेश चिवटे यांनी केला आहे.

गेल्या दहा दिवसात साखर हमालीचे टेंडर देण्यात संचालक मंडळात वाद झाल्यामुळे साखर जाम झाल्यामुळे गाळप कमी झाले. एकंदरीत संचालक मंडळ बचाव समितीला विश्वासात न घेता अजूनही राजकीय स्वार्थासाठी चुकीचे निर्णय घेऊन आदिनाथ अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंवार सूचना देऊनसुद्धा संचालक मंडळ बचाव समितीच्या सूचनाकडे दुर्लक्ष करतात. संचालक मंडळाच्या बैठकीला समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवत नाहीत. आज आदिनाथ कारखान्याच्या कंपाऊंड शेजारचा ऊस बाहेरचे कारखाने घेऊन जात आहेत. केवळ वाहतुकीचे दर निश्चित न केल्यामुळे दुसऱ्या कारखान्याला जात आहे.

१ ते २५ किलोमीटर अंतराच्या दरम्यानच्या सर्व उसाला २५ किलोमीटर प्रमाणे वाहतूक दिली, तर दररोज कारखाना ३५०० मॅट्रिक टन उसाचे गाळप करेल, याकडे जाणीवपूर्वक संचालक मंडळ दुर्लक्ष करत आहे. याच पद्धतीने माळीनगर, म्हैसगाव, कमलाई या कारखान्याने धोरण करून उसाची गाळप वाढवले आहे. आजूबाजूचे कारखाने आदिनाथ ला अडचणीत आणण्यासाठी याच परिसरात जास्त वाहने टाकत आहेत, याची जाणीव संचालक मंडळाला असतानासुद्धा संचालक मंडळ डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे.

यामुळे विद्यमान संचालक मंडळाला आदिनाथ कारखाना चालवायचा आहे का अजून बंद पाडायचा आहे, याबद्दल शंका निर्माण होत आहे, अशी शंका बचाव समितीने व्यक्त केली आहे. बचाव समितीच्यावतीने संपूर्ण आदिनाथच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. रसायन तज्ञ श्री. खाडे, मॅनेजर श्री. आटोळे आदींसह उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी कारखान्याची माहिती दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपंढरपूर येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा फिएस्टा २०२३ उत्साहात संपन्न
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुक्याच्यावतीने एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here