नीरा नरसिंहपूर (बारामती झटका) बाळासाहेब सुतार यांजकडून
पिंपरी बुद्रुक ता. इंदापूर येथे रविवारी दि. 10 रोजी 5 वाजता संजय सुतार यांचे निधन झाले. फुप्फुसाच्या रक्त वाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याने उपचारा दरम्यान निधन झाले. निधना समयी वय वर्ष 38 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 3 मुली, 2 भाऊ, भावजया पुतणे आसा मोठा परिवार आहे.
प्रभाकर विठ्ठल सुतार व सचिन विठ्ठल सुतार यांचे ते बंधू होते. क्रिकेट क्षेत्रांमधील अतिशय उत्कृष्ट कामगिरी असल्यामुळे पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला व सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. दि. 12 वार मंगळवार रोजी सकाळी 7 वाजता तिसऱ्या दिवसाची विधी आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng