राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सरसेनापती महादेवजी जानकर यांच्या शुभहस्ते सन्मान
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी नुकतीच 2023 ची नूतन कार्यकारणी घोषित केली. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली. तसेच दुसरी यादी 1 फेब्रुवारी रात्री ८ वाजता जाहीर करण्यात आली. यामध्ये माळशिरस तालुक्यातुन पत्रकार क्षेत्रात चांगले काम करत असलेले गोरडवाडी गावचे सुपुत्र संजय दत्तू हुलगे यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पद देऊन घोषीत करण्यात आले होते.
माळशिरसमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष माजी कॅबिनेटमंत्री सरसेनापती महादेवरावजी जानकर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर यांच्या उपस्थितीत पत्रकार संजय हुलगे यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र पत्रकार संघाने गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून राज्यात कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. पत्रकारांसाठी कार्यशाळा, रक्तदान शिबिर, कोरोना काळात मदत, व्यक्तिमत्व विकास शिबिर, राज्यातील पत्रकारासाठी विविध व्याख्यानमाला, पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाबाबत निवेदन व पत्रकारांच्या परिवारामागे खंबीरपणे महाराष्ट्र पत्रकार संघ उभा राहिला आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक गुणवंत पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng