माळशिरस ( बारामती झटका )
जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधु तोची ओळखावा देव तेथेची जाणावा! या उक्तीप्रमाणे अपंगांना आधार घेऊन त्यांच्यामध्येच देव पाहणारे संजीवन फौंडेशन यांनी कोरोना कालावधीमध्ये समाज विधायक खूप मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत देवाने एखाद्यावर अन्याय केला तर त्याला आधार देण्याचं काम केलं पाहिजे अशी धारणा मनामध्ये ठेवून संजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देवगुंडे तसेच बापू सरक, प्रशांत पाटील, तुषार कोळेकर यांनी अपंगांना श्रवण यंत्र, तीन चाकी सायकल,व्हील चेअर, वॉकर, काठी अशा अनेक वस्तूचे वाटप करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे, माजी उपसभापती माळशिरस पंचायत समितीचे मच्छिंद्र ठवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी केले.

कोरोना काळात रुग्णांना चांगली सेवा दिल्याबद्दल डॉ. सचिन घोरपडे- बारामती, डॉ. समीर दोशी-अकलूज, डॉ. माधव लवटे-नातेपुते, डॉ. दत्तात्रय निटवे-नातेपुते, डॉ. साईनाथ भोसले-नातेपुते, डॉ. दत्तात्रय माने-सदाशिवनगर यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम पुरंदावडे सदाशिवनगर येथे संपन्न झाला यावेळी अनेक गावचे सरपंच, नूतन नगरसेवक त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य गौतम माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशआबा पालवे,भानुदास सालगुडे, जीवन जानकर, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत पालवे,बबन पालवे, पं. स. सदस्य अजय सकट, मेडदचे माजी सरपंच युवराज झंजे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

“संजीवन फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोना काळात वेगवेगळे उपक्रम घेऊन मदत करण्यात आली तसेच भविष्यातही दिव्यांग, प्राथमिक शिक्षण, खेळ आणि उपेक्षित घटकांसाठी कार्य केले जाणार आहे.”
-संजय देवगुंडे-अध्यक्ष, संजिवन फाउंडेशन
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng