संत बाळुमामा गुढीपाडवा भंडारा उत्सव जळभावीमध्ये जल्लोषात साजरा होणार

जळभावी (बारामती झटका)

श्री संत चक्रवर्ती पांडुरंग कृपामुर्ती सकळ जीव विश्वशांती सद्गुरू संतवंदनीय बाळुमामा गुढीपाडवा भंडारा उत्सव, जळभावी प्रेरणास्थान आ.परम पुज्य गुरुवर्य श्री. अजिनाथ महाराज, जळभावी मठ दि. ०२/०४/२०२२ रोजी गणेश पूजन, बाळूमामा प्रतिमा पूजन, जप पूजन, विना पूजन, बाळूमामा विजय ग्रंथ पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

दि. १-४-२०२२ रोजी सायं. ६ वा. कलश पुजन (कपाछात्र दाता परमानंदमुर्ती गुरुवर्यश्री. अजिनाथ महाराज) हरिजागर जळभावी, गोरडवाडी, मांडकी, रेडे, भांबुर्डी, माळशिरस, गारवड व पंचक्रोशीतील भजणी मंडळ यांचा होईल. ८ ते १० ह.भ.प. बापू महाराज राउत यांचे किर्तन होणार असून किर्तन साथ जळभावी, गोरडवाडी, मांडकी, रेडे, भांबुर्डी, माळशिरस, गारवड येथील भजनी मंडळाची असणार आहे. दि. २-४-२०२२ रोजीचा कार्यक्रम सकाळी ७ वा. जपमाळ जगदीप महाराज, ९ ते ११ होमहवन, १२.३० ते १.३० प्रथम भजन पंचपदी होईल. १.३० ते ६ वाजता पालखी मिरवणुक जळभावी भजनी मंडळ, ५.३० ते ६ येणाऱ्या मान्यवरांचे सत्कार समारंभ ६ ते ७ आरती व महाप्रसाद मायाक्का ओविकार मंडळ, जळभावी ह.भ.प. ब्रम्हदेव महाराज केंगार कन्हेर यांचे भारूड कार्यक्रम असणार आहे. गजीढोल, भजनी मंडळ सर्व महिला मंडळ कळशी नारळ घेऊन पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मंडप डेकोरेशन मेघा डिजे मासाळवाडी, सरस्वती ब्रास बॅन्ड कंपनी यांचे असणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी जळभावी संपर्क – मो. ९४२००९३८२२, ८६००१७६१४४, संयोजक समस्त संत बाळुमामा भक्त, जळभावी मठ यांच्याशी संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजळभावी गावात राजकीय नेत्यांचे एकमेकांचे राजकीय पाणी कमी करण्याच्या नादात गावालाच प्यायला पाणी नाही.
Next articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी धर्मादाय आयुक्त यांची सह्याद्री रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निवेदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here