मोडनिंब (बारामती झटका)
दि. 26 जून लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड मोडनिंब शहर व माढा तालुक्याच्या वतीने “लोकराज्य दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मोडनिंब शहरातील श्री उमा विद्यालय व किमान कौशल्य विभाग, संगन बसवेश्वर कन्याप्रशाला, संजीवन विद्यालय, शांती निकेतन विद्यालय तसेच संत सावता माळी विद्यालय अरण या प्रशालेतील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा हार, गुलाबपुष्प व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मोडनिंब ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी अनिल आप्पा शिंदे हे होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारणी सदस्य शिवश्री दिनेश जगदाळे, शिवश्री दिगंबर मिसाळ तालुकाध्यक्ष माळशिरस, रा.काँ. पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवश्री कैलास तोडकरी, मा.सरपंच शिवश्री कुरण गिड्डे, मा.उपसरपंच शिवश्री दत्ता सुर्वे, मनसे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रशांत गिड्डे, ग्रामपंचायत सदस्य शिवमती योगिता शिंदे, शिवश्री अमर ओहोळ, शिवाजीराजे सुर्वे, शिवश्री किरण खडके, शिवश्री अनिल सावंत, शिवश्री बाळासाहेब पाटील, शिवश्री बालाजी पाटील, बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री सुनिल ओहोळ, शिवसेना गटप्रमुख शिवश्री दिपक सुर्वे, शिवश्री संजीव शिंदे, शिवश्री उदय जाधव, शिवश्री गौतम ओहोळ तसेच संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवश्री शंकर नागणे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवश्री अजय गायकवाड, पिंपळनेर गटप्रमुख शिवश्री अभयसिंह पाटील तसेच सुदर्शन पाटील सर, कुंभार सर, बनसोडे सर, शेखर सुर्वे सर, भालेराव सर, माऊली पवार, पृथ्वीराज साळुंखे, विठ्ठल गिड्डे, वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शेती आदी क्षेत्रातील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे कार्य हे समाजाला एक वेगळी दिशा देणारे होते. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घेऊन त्या पद्धतीने मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप यांनी केले. तसेच शिवश्री दिनेश जगदाळे, सरपंच प्रतिनिधी शिवश्री अनिल शिंदे, शिवश्री सुनिल ओहोळ, शिवश्री संजीव शिंदे, शिवश्री प्रशांत गिड्डे, शिवश्री कैलास तोडकरी यांनी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड माढा तालुका संघटक शिवश्री बाळासाहेब वागज सर आणि मोडनिंब शहराध्यक्ष शिवश्री भैय्या माने यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब वागज सर यांनी केले तर आभार प्रदर्शन भैया माने यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng