संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका कार्यकारणी पुनर्गठन आढावा बैठक संपन्न

अकलूज (बारामती झटका)

संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका कार्यकारणी पुनर्गठन आढावा बैठक संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह अकलूज या ठिकाणी पार पडली. सदर कार्यकारणी आढावा बैठकीची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप यांच्याहस्ते करून करण्यात आली‌.

यावेळी तालुक्यातील संभाजी ब्रिगेड कार्यकारणीची व तालुक्यातील विविध विषयांवरती सखोल अशी चर्चा करण्यात आली. येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे व गाव तेथे शाखा ओपनिंग कराव्या अशा सूचना व आदेश तालुकाध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप यांचा सन्मान करण्यात आला. सदर बैठकीचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी केले. या आढावा बैठकीस जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड रणजीत भाकरे-चव्हाण, संभाजी ब्रिगेड माढा ता.संघटक वागज सर माढा तालुका, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अतुल गायकवाड, इंजि. बबनराव शेंडगे साहेब, माउली कचरे, विशाल मिसाळ, प्रमोद मिसाळ, बबलु मिसाळ, सुरज पवार आदी आवर्जून उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांनी महावस्त्र खरेदीवर बक्षीसामध्ये सहभाग नोंदविला.
Next articleव्यसनमुक्त संघाचे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या महाराज कराडकर यांची लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here