संभाजी ब्रिगेड सोलापूर-पंढरपूर विभाग व इक्विटस ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी मेळावा

सोलापूर (बारामती झटका)

टेंभुर्णी ता. माढा येथे संभाजी ब्रिगेड सोलापूर-पंढरपूर विभाग व इक्विटस ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता धनलक्ष्मी इरिगेशन सिस्टम शेजारी, एम.आय.डी.सी. हॉल, टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व इच्छुक तरुण तरुणींनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवश्री सचिन (बापू) जगताप जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, सोलापूर-पंढरपूर विभाग (मो.9696969558) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या भव्य नोकरी मेळाव्याचे उद्घाटन शिवश्री मनोजकुमार गायकवाड प्रदेश सहसंघटक संभाजी ब्रिगेड, शिवश्री संग्राम पाटील सीएसआर मॅनेजर इक्विटस ट्रस्ट, शिवश्री अमोलशेठ जगदाळे संस्थापक अध्यक्ष, एमआयडीसी असो. टेंभुर्णी, शिवश्री दिनेश जगदाळे निरीक्षक, सांगली/कोल्हापूर जिल्हा संभाजी ब्रिगेड, शिवश्री किरणराज घाडगे पुणे विभागीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, शिवश्री राजाभाऊ ढेकणे अध्यक्ष, एमआयडीसी असो. टेंभुर्णी, शिवश्री संतोष बाबर क्लस्टर मॅनेजर इक्विटस यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी एमआयडीसी असो‌. टेंभुर्णी, यांचे विशेष सहकार्य असणार आहे. तरी या नोकरी मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त तरुण तरुणांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

यासाठी शैक्षणिक पात्रता :- दहावी, बारावी, बी.ए , बी.एस्सी, बी.कॉम, एम.ए, एम.एस्सी, एम.कॉम, बी.एस्सी ॲग्री, एम.एस्सी ॲग्री, आय.टी.आय डिप्लोमा, बी.ई, पदवीधर इ.

आवश्यक कागदपत्रे : दहावी, बारावी मार्कशिट, पदवीधर प्रमाणपत्र, आधार कार्ड इ.
(टीप : RESUME Compulsory)

नावनोंदणी संपर्क :
प्रमोद पवार – ९७३०८७२९१३
माधुरी मुसळे – ८६६८२३२११५

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे व भव्य दिव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन
Next articleशहरवासियांनो सावधान; भाजपकडून पुन्हा नव्या जुमल्यांना सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here