करमाळा (बारामती झटका)
संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था मजबूत करून सर्वसामान्यांना मोफत उपचार देणे व राज्यातील एकही व्यक्ती उपचाराअभावी वंचित राहू नये, ही भूमिका घेऊन काम करीत असलेले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था मजबूत होत आहे, असे प्रतिपादन विद्या विकास मंडळाचे संचालक चेअरमन विलासराव घुमरे यांनी केले. शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या दुसऱ्या दिवशीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष कलीम काझी, आदिनाथचे संचालक प्रकाश पाटील, वस्ताद अजिनाथ कोळेकर, रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण, जेष्ठ पत्रकार नासिर कबीर, शिवसेनेचे युवा नेते गजराज चिवटे, वैद्यकीय कक्ष समन्वयक नागेश शेंडगे, प्रभारी अध्यक्ष रोहित वायबसे, तालुका समन्वयक दीपक पाटणे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शाल, श्रीफळ देऊन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष कलीम काझी व विद्या विकास मंडळाचे संचालक चेअरमन विलासराव घुमरे यांचा सत्कार केला.
शिबिराच्या पहिल्या दिवशी 517 रुग्णांची तपासणी करून जवळपास 372 लोकांना मोफत चष्म्याची वाटप करण्यात आले व सर्वांना मोफत औषधे देण्यात आली. आज सोमवार दुसऱ्या दिवशी 670 रुग्णांनी नोंद केली असून रुग्णांची तपासणी करण्याचे काम 35 डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कामकाज सर्व धर्मातील लोकांना पुढे घेऊन जाणारे असून मुस्लिम समाजाच्या लोकांना सुद्धा अभिमान वाटावा असे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. आज त्यांच्या वैद्यकीय मदत पक्षाचा फायदा समाजातील गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. – कलीम काझी, मुस्लिम समाजाचे नेते
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng