जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सईने दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल पुढील वाटचाली करता बारामती झटका परिवार यांचेकडून हार्दिक शुभेच्छा.
पुणे ( बारामती झटका )
सई संदीप बोरकर या कन्येने लहान मुलांमध्ये सर्वात जास्त वेळ 40 मिनिटे 9 सेकंद व 26 मिलि सेकंद चक्रासनाचा विश्वविक्रम नोंदवून दैदिप्यमान यश संपादन करून “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये विक्रमाची नोंद झालेली आहे. सई हिचे बारामती झटका परिवार यांचेकडून अभिनंदन व पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
सईचा जन्म 16 सप्टेंबर 2011 रोजी झालेला आहे. आई सौ. प्रज्ञा संदीप बोरकर मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स एल.एल.बी. व वडील श्री. संदीप मारुती बोरकर एल.एल.बी. दोघेही सुप्रसिद्ध विधी तज्ञ वकील आहेत. सध्या पुणे येथे राहत आहेत. संदीप बोरकर यांचे हायस्कूल शिक्षण इंग्लिश स्कूल वेळापूर, ता. माळशिरस येथे झालेले आहे.
सईला लहानपणापासून योगाची आवड होती. चक्रासनाचा आठ महिने तिचा सराव सुरू होता. अडचणीचा सामना करावा लागलेला होता. सराव करीत असताना करंगळी फॅक्चर झालेली होती. त्यामुळे सराव करताना खंड पडलेला होता. करंगळी व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने सहीने तयारी करत 40 मिनिटे 9 सेकंद व 26 मिली सेकंद चक्रासनाच्या स्थितीमध्ये राहत आपल्या देशातील मुलांमध्ये सर्वात जास्त वेळ चक्रासनाचा विक्रम नोंदविलेला आहे. सईच्या दैदिप्यमान यशाबद्दल अनेक स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चिमुकल्या सईने दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल सुशिक्षित व सुसंस्कृत असणारे ॲड. श्री. संदीप मारुती बोरकर व ॲड. सौ. प्रज्ञा संदीप बोरकर यांना आपल्या मुलीबद्दल अभिमान आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng