फलटण (बारामती झटका)
आज दिनांक 26 फेब्रुवारी ला छत्रपती खा. संभाजीराजे भोसले महाराज हे मराठा आरक्षण व विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ फलटण तालुका व शहर यांच्यावतीने तहसील कार्यालय फलटण येथे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका व शहरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन पाठींबा दिला आहे.
यावेळी सातारा जिल्हा आदर्श महिला सरपंच सौ. अस्मीता निंबाळकर, भाजपा प. महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, माउली सावंत, दताञय गुजवटे, ॲड. विरेन कदम, घोरपडे सर, यशवंत खलाटे, बाळासो कदम, अभिजीत बेडके, शभुराज खलाटे, प्रज्वल पाटणकर, स. रा. मोहीते सर, मोहन डांगे, नानासो पवार, विजय कदम, राजेंद्र निंबाळकर, इंद्रजीत निंबाळकर आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng