सत्ताधारी अन विरोधकांना लाज वाटत नाही, बीडच्या शेतकरी आत्महत्येवरून संदीप जगताप यांची आगपाखड

आता जागे व्हा, स्वतःच्या प्रश्नांसाठी संघर्ष करा, पक्षीय गुलामीतून बाहेर या, आत्महत्या थांबवा, संदीप जगताप यांचे आवाहन…

नाशिक (बारामती झटका)

ईडी, धाडी, आजाण, भोंगे यांच्या आवाजात आपला आवाज कोणालाच ऐकू जात नाही. अवघा एक एकर ऊस कारखाना तोडत नाही. पुढं संसार कसा करायचा.? या अस्वस्थेतून नामदेव जाधव हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड येथील 30 वर्षीय ऊस उत्पादक शेतकऱ्यांने स्वतःचा ऊस पेटवून दिला व त्याच शेतातल्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना कानावर आल्यावर मन सुन्न झालं. आत्महत्या हा कसल्याच समस्येवर पर्याय नाही. पण कोणी हौस म्हणून आत्महत्या करत नाही. जगण्याची सगळे दारं बंद झाली अस वाटतं तेव्हाच अशा घटना घडतात. या देशातील सत्ताधारी व विरोधक यांनी जो तमाशाचा फड उभा केलाय, त्यांच्या रंगबाजीत किंवा वगनाट्यात सर्व सामान्यांच्या प्रश्नांना जागा नाही. म्हणून लोक अस्वस्थ आहेत व अशा घटनांची दोघांनाही लाज वाटत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे.

पुढे ते असेही म्हणाले कि, जेव्हा तरुणांना कळेल की धर्म हा माणसासाठी असतो. माणूस जगला तर धर्म मोठा होतो, जगतो, म्हणून धर्माचे काम म्हणजे माणसासाठी काम. गोरगरिबांना उभं करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं म्हणजे देवाचं काम. व जो हे करील त्याच्या मागेच आम्ही उभे राहू असे जेव्हा जनता ठरवील, तेव्हाच सत्ता पिपासुंचे दुकानं बंद होतील. म्हणून आपण जागृत व्हा, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक काम करणाऱ्यांना साथ द्या. ही व्यवस्था बदलण्याची तयारी करा. नेत्यांच्या आणि पक्षांच्या गुलामीतून मुक्त व्हा. ते तुमचा फक्त वापर करत आहेत. अन आपले बांधव अशा आत्महत्या करताहेत. आपण काही जात्यात काही सुपात आहे. आत्महत्येचं जातं आपल्याला सगळ्यांना मिळून उखडून फेकावं लागेल. त्यासाठी टक्केवारीवर जगणारे तुमच्या कोणत्याच पक्षाचे नेते पुढं येणार नाहीत. आपल्यालाच शेतकरी चळवळ मजबूत करणे या शिवाय दुसरा पर्याय नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकण्हेर गावांमध्ये भारतीय जनता पक्षाला पडले खिंडार, माजी उपसरपंचासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.
Next articleचंद्रकांत पाटील व भाजपने शरदचंद्रजी पवार साहेबांची जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू – रविकांत वरपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here