सदगुरु श्री श्री साखर कारखाना बचेरीच्या विकासातील दीपस्तंभ… #सदगुरु श्री श्री साखर कारखाना #बचेरी #पाणी टंचाई


सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा पाण्याचा प्रश्न सोडविला

बचेरी (बारामती झटका)

सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरीराव सर यांना मंगळवार दि. २१/०३/२०२३ रोजी बचेरी गावचे शिष्टमंडळ सरपंच महादेव पाटील, उपसरपंच मोहन शिकारे, प्रा. सदाशिव शिंदे, बिराभाई शिंदे, गणेश काका गोडसे, विश्वजित गोरड, राजु गटकुळे, श्रीकांत गटकुळे यांनी गावच्या पिण्याच्या पाण्याची व्यथा मांडली. यावेळी गावातील नागरीक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत व पुढील २ महिने पाणी समस्या सोडविण्याची विनंती केली. तसेच आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. इतर दिवशी लोक कुठुन पाणी आणणार ? व २ महिन्यात पाऊस येईल का ? असे बोलून चेअरमन एन. शेषागिरीराव यांनी पाऊस पडेपर्यंत दररोज पाणी घ्या, असे सांगितले. यासाठी तात्काळ मंजुरी देऊन सिव्हील इंजिनियर जमदाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन घेण्यास सांगितले.

त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून २०१२ साली चेअरमन एन. शेषागिरीराव व व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांना पिलीव कॅनल शेजारी गावच्या पाणीपुरवठा विहीरीसाठी २ गुंठे जागा दिली आहे. तेथून पाणीपुरवठा पाईपलाईन करणेसाठी कारखाना चारी खोदण्यासाठी व इतर अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करेल, असे चेअरमन साहेबांनी शिष्टमंडळाला सांगितले. याप्रसंगी कारखान्याच्या संचालिका सौ. उषाताई मारकड उपस्थित होत्या.

तीव्र पाणी टंचाई असतानाही शासन, प्रशासन यांनी पाणी विषयावर गांभीर्य दाखविले नाही. मात्र सदगुरु श्री श्री रविशंकर यांचे शिष्य उद्योगपती, सामाजिक बांधिलकी जपणारे शेषागिरीराव यांनी बचेरी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता टंचाई काळात सोडवल्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी चेअरमन एन. शेषागिरीराव सर व कारखान्याचे मनापासून आभार मानले आहेत.

गावच्या समस्या सोडविण्यात कारखाना प्रशासनाचे मोठे योगदान व सहकार्य आहे. सदगुरु श्री श्री साखर कारखान्यामुळे बचेरीसह परिसरातील रस्ते व आर्थिक विकास झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणा-या सदगुरु श्री श्री कारखान्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleएक लाखाची लाच घेताना सरपंचपती जाळ्यात #सरपंचपती #लाचलुचपत विभाग
Next articleआ. संजयमामा शिंदे यांची रस्त्याच्या दुर्दशेमुळे होऊ लागली प्रवासाची तारांबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here