सदाशिवनगरचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच वीरकुमार दोशी यांनी प्रकल्प संचालकाची भेट घेतली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणाने प्रलंबित समस्यांना वाचा फोडण्याकरीता सरपंच वीरकुमार दोशी शिष्टमंडळाने पंढरपूर येथे भेट घेतली.

पंढरपूर ( बारामती झटका )

सदाशिवनगर, ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच श्री. वीरकुमार अनंतलाल दोशी यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे प्रकल्प संचालक श्री. घोडके साहेब यांची पंढरपूर येथे सदिच्छा भेट घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणाने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या प्रलंबित समस्यांना वाचा फोडण्याकरता सरपंच वीरकुमार दोशी यांच्या शिष्टमंडळाने पंढरपूर येथे भेट घेऊन सदाशिवनगर मधील समस्यांवर व अडचणींवर चर्चा करण्यात आली.

सदाशिवनगर मधील स्मशानभूमी येथे जाण्यासाठी महामार्गाच्या हायवेवरून क्रॉसिंगच्या रोड सदाशिवनगर येथे नवीन एसटी स्टँड उभा करणे, व्यापारी लाईन येथील गटारीची सोय करणे, मेन रोड ते पशुवैद्यकीय दवाखाना राऊत वस्ती या ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी मुरमीकरण करून देणे, फाटा नंबर ५२ कॅनलवर छोटा बोगदा ठेवून लक्ष्मी देवी मंदिराला पर्यायी जागा देऊन मंदिर उभा करणे या सर्व विषयांशी चर्चा सल्लामसलत करण्यात आली. महामार्गाचे प्रकल्प संचालक यांनी सर्व समस्या जाणून घेऊन सर्व कामे प्राधान्याने करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी शिष्ट मंडळात नूतन सरपंच वीरकुमार दोशी, हरिभाऊ पालवे, हनुमंत धाईंजे व इतर उपस्थित होते.

थेट जनतेतील सरपंच पदासाठी उभे असलेले वीरकुमार दोशी यांनी प्रचारामध्ये जनतेला शब्द दिलेला होता, बोलण्यापेक्षा करून दाखवीन तोच शब्द खरा करत सरपंच पदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर वीरकुमार दोशी यांनी विकास कामे व प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचा धुमधडाका सुरू केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकु. संस्कृती काळे हीचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
Next articleजांबुड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी श्री. सुहास पांडुरंग यादव यांची बिनविरोध निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here