सदाशिवनगरचे विमा प्रतिनिधी सागर उरवणे यांना अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विमा परिषदेमध्ये सहभागी होण्याचा बहुमान

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर येथील LIC विमा प्रतिनिधी श्री. सागर उरवणे यांना अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विमा परिषद २०२३ मध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. याबद्दल त्यांच्यावर नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सदाशिवनगर येथील श्री. सागर उरवणे हे गेली १९ वर्षांपासून LIC चे विमा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. सध्या ते झोनल मॅनजर क्लब मेंबर आहेत. दि. ०१ जानेवारी २०२२ ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये त्यांनी हे उद्दिष्ट पूर्ण केले आणि विमा क्षेत्रातील मानाचा M.D.R.T. हा बहुमान प्राप्त केला व ते अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमा परिषदेत सहभागी होणार आहेत. हे उद्दिष्ट पूर्ण करीत असताना त्यांना पंढरपूर शाखेचे शाखाधिकारी श्री. डोईफोडे साहेब, उपशाखाधिकारी फणसाळकर साहेब, अकलूज शाखेचे शाखाधिकारी आगवेकर साहेब आणि विकास अधिकारी निकम साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleखा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे करमाळा तालुक्यातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व अभिनंदन…
Next articleHow to pick the Best Anti-virus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here