Uncategorizedताज्या बातम्या

सदाशिवनगर ग्रामपंचायतचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार विरकुमार दोशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील मित्र सहकार ग्राम विकास आघाडी सदाशिवनगर पॅनलचा थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

सदाशिवनगर ( बारामती झटका )


सदाशिवनगर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील मित्र सहकार ग्रामविकास आघाडी सदाशिव नगर या पॅनलच्या लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रचाराचा शुक्रवार दिनांक 09/ 12/2022 रोजी सकाळी 09 वाजता शुभारंभ मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात पार पडलेला आहे.


माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या सदाशिवनगर येथील कारखाना स्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला गावातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवतांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी रत्नत्रय परिवाराचे संस्थापक आ नंतलाल दोशी, माझी पंचायत समिती सदस्य अभिमान सावंत, सदाशिव नगरचे माजी सरपंच व धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचे चेअरमन प्रतापराव सालगुडे पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अर्जुन धाईंजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, युवा उद्योजक प्रशांतशेठ दोशी शिवाजी गेंड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले मारुती खांडेकर वस्ताद तुकाराम चव्हाण, बापू मोहिते जगदीश राजमाने पंकज पानसरे सर बबन भुजबळ रघुनाथ सुतार हनुमंत धाईंजे शंकर बनकर सुरेश धाईंजे, अभिजीत दोशी यांच्यासह गावातील नेते कार्यकर्ते व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील मित्र सहकार ग्रामविकास आघाडी सदाशिवनगर पॅनल मधून थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार वीरकुमार अनंतलाल दोशी, वार्ड क्रमांक 1 संजीवनी नवनाथ ओवाळ, तानाजी दत्तू ओवाळ, सुनिता किशोर देवकुळे, वार्ड क्रमांक 2 उदय सुरेश धाईंजे, सुमन नारायण भोसले, विष्णू बबन भोंगळे वार्ड क्रमांक 3 लक्ष्मण पंढरी मोहिते नंदा तुकाराम चव्हाण, वार्ड क्रमांक 4 विमल चंद्रकांत तोरणे, वंदना हनुमंत कर्चे, तानाजी आगतराव पालवे असे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत सरपंच पदाचे उमेदवार यांचे चिन्ह छताचा पंखा तर पॅनल मधील सदस्यांना ट्रॅक्टर, खटारा, रोड रोलर अशी चिन्हे मिळालेली आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort