सदाशिवनगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत वार्ड क्र. २ मध्ये नारायण सालगुडे पाटील व विष्णु भोंगळे यांच्यात लक्षवेधी लढत…

विष्णू भोंगळे यांनी वार्डात होम टू होम प्रचार करून प्रचारात आघाडी घेतली आहे, त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

सदाशिवनगर ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पदाची व ग्रामपंचायत सदस्यांची चुरशीची निवडणूक लागलेली आहे. दोन्ही पॅनलकडून प्रचाराची रणधुमाळी उठलेली होती. वार्ड क्र. २ मध्ये माजी उपसरपंच नारायण सालगुडे पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोंगळे यांच्यात लक्षवेधी लढत लागलेली आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ग्रामविकास पॅनलमधून थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार वीरकुमार अनंतलाल दोशी आहेत. वार्ड क्र. २ मध्ये विष्णू भोंगळे व इतर दोन सदस्य उभे राहिलेले आहेत. सहकार महर्षी पॅनलमधील सदस्य व विष्णू भोंगळे यांनी होम टू होम प्रचार करून प्रचारांमध्ये आघाडी घेतलेली आहे. त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. विष्णू भोंगळे यांनी ग्रामपंचायतमध्ये गेल्या पाच वर्षात सदस्य कार्यकाळात सर्वसामान्य जनतेची अनेक कामे केलेली आहेत. विष्णू भोंगळे यांना सर्वसामान्य जनता व तरुण वर्गांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

आ. रणजितसिंह मोहिते पाटील ग्रामविकास पॅनलचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार माणिक सोपान सुळे पाटील आहेत. वार्ड क्र. २ मध्ये माजी उपसरपंच नारायण सालगुडे पाटील व इतर दोन सदस्य आहेत. आ. रणजितसिंह मोहिते पाटील पॅनलमधील सदस्य व नारायण सालगुडे पाटील यांनीही होम टू होम प्रचार करून मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत. उपसरपंच पदाच्या कार्यकाळात अनेक कामे केलेली आहेत. ते सर्वसामान्य जनतेच्या कायम उपयोगी पडत असतात. सालगुडे पाटील यांना राजकीय वारसा आहे. मात्र, विष्णू भोंगळे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने गोरगरीब व सामान्य जनता विष्णू भोंगळे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दिसत आहे. दि. 18 तारखेला मतदान आहे. २० तारखेला मतमोजणी आहे. नारायण सालगुडे पाटील व विष्णू भोंगळे यांची लक्षवेधी लढत असल्याने सदाशिवनगरसह माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराजेंद्र गुंड यांना साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय युवा पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर
Next articleमा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प (स्मार्ट) भाग – २ सतिश कचरे म.कृ.अ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here