सदाशिवनगर ग्रामपंचायत उपसरपंच पदी विष्णू भोंगळे यांना संधी द्यावी, सर्वसामान्य जनतेची अपेक्षा….

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडणुकीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पॅनलचा दणदणीत विजय होऊन थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच वीरकुमार अनंतलाल दोशी भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत‌. बहुमताने ग्रामपंचायत सदस्य सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यापैकी ग्रामपंचायतीचे दुसऱ्यांदा दैदीप्यमान विजय संपादन केलेले विष्णू भोंगळे यांना उपसरपंच पदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मोहिते पाटील यांचे अनेक समर्थक आहेत, त्यापैकी भोंगळे परिवार आहे. श्रीमती सत्यभामा भोंगळे यांनी चार वेळा ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून कार्यकाल पूर्ण केलेला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विष्णू भोंगळे त्याच वार्डामध्ये निवडणूक लढवून विजयी झालेले होते. यंदाच्या निवडणुकीत आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील पॅनलमधील माजी उपसरपंच नारायण सालगुडे पाटील यांचा पराभव करून विजयी झालेले आहेत. सत्यभामा भोंगळे यांनी आपल्या वीस वर्षाच्या कालावधीत मोहिते पाटील यांच्या विचाराशी बांधील राहून काम केलेले आहे. सत्यभामा यांचा वसा व वारसा पुढे विष्णू भोंगळे यांनी सुरू ठेवलेला आहे.

मोहिते पाटील परिवारातील सदस्यांचे विश्वासू सहकारी म्हणून विष्णू भोंगळे यांच्याकडे पाहिले जाते. विष्णू भोंगळे यांनी सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सर्वसामान्य व तळागाळातील जनतेची कामे व अडचणी सोडवत असल्याने सर्वसामान्य जनतेतून, विष्णू भोंगळे यांची उपसरपंच पदावर नियुक्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत युवानेते विकासभैय्या घुले यांचा जाहीर प्रवेश.
Next articleThe very best Antivirus With respect to Windows

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here