सदाशिवनगर ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचे उमेदवार बजरंग कत्ते यांचा वीरकुमार दोशी यांना जाहीर पाठिंबा

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पॅनलचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार श्री. वीरकुमार दोशी व सर्व सदस्यांना पाठिंबा दिला

सदाशिवनगर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. थेट जनतेतील सरपंच पदासाठी चार उमेदवार उभे आहेत. त्यापैकी अपक्ष थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार श्री. बजरंग दादा कत्ते निवडणुकीत उभे होते. त्यांना कपबशी हे चिन्ह मिळालेले होते. प्रचार सुद्धा सुरू केलेला होता. श्री. बजरंग कत्ते यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पॅनलचे थेट सरपंच पदाचे उमेदवार श्री. वीरकुमार अनंतलाल दोशी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना पाठिंबा दिलेला आहे. बजरंग कत्ते यांच्यावर निष्ठा व प्रेम असणाऱ्या मतदारांना आवाहन केलेले आहे, मला मतदान करण्याऐवजी वीरकुमार अनंतलाल दोशी यांना मतदान करावे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पॅनलचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार वीरकुमार अनंतलाल दोशी यांचा होम टू होम प्रचार सुरू आहे. त्यांना बजरंग कत्ते यांनी पाठिंबा दिल्याने मिळणाऱ्या मतदानामध्ये वाढ होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleSelecting the best Virtual Info Room Software program
Next articleमतदारांनी संधी दिल्यास गावाचा झकास विकास करेन – थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार सौ.. विजया रामदास गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here