विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंचायत समिती सदस्य अर्जनसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
विधानपरिषद आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून व पंचायत समितीचे माजी उपासभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या जलजीवन अभियान अंतर्गत नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभाचे उदघाटन RPI चे जिल्हाध्यक्ष श्री. सोमनाथ भोसले, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. अर्जुन धाईंजे यांच्या शुभहस्ते व सदाशिवनगर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.

यावेळी जाधववाडीचे सरपंच शिवाजी जाधव, मेडदचे उपसरपंच शिवाजी लवटे, तामसिदवाडीचे माजी उपसरपंच गजानन गोरे, माजी उपसरपंच शोभा मोघे, हरिभाऊ पालवे व सदाशिवनगर ग्रामपंचायतचे सदस्य सुमन भोसले, नंदा चव्हाण, द्रौपदी मोहिते, विष्णू भोंगळे, माजी सरपंच तानाजी पालवे, माजी उपसरपंच विरकुमार दोशी, तुकाराम चव्हाण, चिंगाबाई ओव्हाळ, माजी ग्रा. सदस्य सारिका राऊत, RPI शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव, संतोष मोघे, तुकाराम जाधव, तानाजी ओव्हाळ, अतुल ओव्हाळ, अशोक ओव्हाळ, संतोष जाधव, पांडुरंग राऊत, विशाल प्रताप सालगुडे पाटील, जयजीत जितेंद्र सालगुडे पाटील, अविनाश बनसोडे, प्रशांत तोरणे, धनाजी बनसोडे, उदय धाईंजे, नितीन कांबळे, बापू गाडे, प्रशांत भोसले, प्रशांत सोरटे, शुभम सावंत, जीवन जाधव, अनिल ओव्हाळ, सागर ओव्हाळ, सोमनाथ बनसोडे, प्रथमेश थोरात, सुजित भोसले, राहुल मदने, सचिन राऊत, महादेव हाके, नाना चव्हाण, उमाजी जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

