सदाशिवनगर येथील धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचा 32 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

सदाशिवनगर ता. माळशिरस येथील धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचा बत्तिसावा वर्धापन दिन उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील, लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, पुरंदावडे गावचे सरपंच देविदास ढोपे, जाधववाडी गावचे सरपंच शिवाजीराव जाधव, ज्येष्ठ नेते पोपटराव गडगडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवराज निंबाळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ भोसले, विठ्ठल अर्जुन, पालवे वस्ताद, तुकाराम चव्हाण, पत्रकार विष्णुपंत भोंगळे सर, समाधान मिसाळ, पतसंस्थेचे चेअरमन प्रताप सालगुडे पाटील, व्हाईस चेअरमन प्रशांत दोशी सचिव विष्णू पवार यांच्यासह पतसंस्थेचे आजी-माजी संचालक, सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमनाथ भोसले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धर्मवीर पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान चेअरमन प्रताप सालगुडे पाटील व व्हाईस चेअरमन प्रशांत दोशी यांच्या शुभहस्ते उपस्थित मान्यवरांच्या समवेत करण्यात आला.


धर्मवीर सदाशिवराव माने पाटील उर्फ सदुभाऊ यांची धर्मवीर ज्योत शिखर शिंगणापूर येथून अकलूजकडे दरवर्षी जात असते. धर्मवीर ज्योतीचे स्वागत पतसंस्थेच्या वतीने करून ज्योत आणणाऱ्या कार्यकर्त्यांना व उपस्थितांना चहापान व नाश्त्याची सोय केली जाते.


धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्था सदाशिवनगर या पतसंस्थेची स्थापना दि. 13 मार्च 1990 साली संस्थापक विजयसिंह मोहिते पाटील व मार्गदर्शक प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती. धर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन नामदेव सालगुडे पाटील यांनी 25 वर्ष चेअरमन पदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याकडे ऊस तोडणी वाहतूक संघाचे अध्यक्षपद होते. प्रतिकूल परिस्थितीत संस्थेची वाटचाल विजयदादा व पप्पासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे चाललेली होती. त्यांच्या पश्चात 2015 सालापासून प्रताप नामदेव सालगुडे पाटील चेअरमन आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र माळशिरस तालुका आहे. संस्थेचे सभासद 1220 आहेत. सध्या संस्थेकडे 10 कोटी ठेवी आहेत. कर्जदारांना 8 कोटीचे वाटप केलेले आहे. संस्थेचे कर्जदार वेळेवर कर्जाची परतफेड करत आहेत‌. संस्थेचे 7 पिग्मी एजंट दैनंदिन 70 हजार रुपये पिग्मी जमा करीत आहे. सदाशिवनगर येथे मुख्य शाखा आहे. संस्थेचा कारभार सचिव व्यवस्थापक मॅनेजर विष्णू पवार, नऊ कर्मचारी यांच्यावर संस्था सुरू आहे. संस्थेचे चेअरमन प्रताप सालगुडे पाटील, व्हाईस चेअरमन प्रशांत दोशी यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांच्यावर विश्वास ठेवून ठेवीदार आपल्या ठेवी ठेवत आहेत. ठेवीवर 9 ते 10 टक्के व्याज दिले जाते. कर्जदार सुद्धा कर्जाचे हप्ते वेळेवर भरित आहेत. कर्जावर 14 टक्के व्याज आकारले जात आहे. पतसंस्थेच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वर्गीय इंदिराबाई बाबाराव कडू यांचे प्रदीर्घ आजाराने निधन, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दुःखाचा बांध फुटला…
Next articleA fabulous Eastern side https://top10ten.co.uk/northern-ireland/county-antrim/1058-4-slemish-mountain.html Marine Australia Road trip Routine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here