सदाशिवनगर येथील विकास सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी वस्ताद नारायण सालगुडे पाटील तर, व्हाईस चेअरमन पदी तानाजी काळेल यांची निवड.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घोडदौड सुरू आहे.

सदाशिवनगर ( बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथील ज्ञानेश्वर सालगुडे पाटील विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बिनविरोध चेअरमनपदी वस्ताद नारायण सालगुडे पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी तानाजी कुंडलीक काळेल यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संस्थेचे चेअरमन भाजपचे जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सालगुडे पाटील, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन वस्ताद नारायण ज्ञानेश्वर सालगुडे पाटील यांच्या संस्थेची घोडदौड सुरू आहे. 2014 साली स्थापन झालेल्या सेवा संस्थेच्या संस्थापक चेअरमनपदी वस्ताद नारायण सालगुडे पाटील यांची कायम बिनविरोध निवड होत आहे. संस्थेचे एक कोटीच्या आसपास वाटप केले जाते, संस्थेचा वसूल शंभर टक्के आहे. संस्था नफ्यात येत असून यंदाच्या वर्षीपासून सभासदांना बोनस वाटण्याचे काम सुरू होणार आहे. संस्थेचा पारदर्शक कारभार सचिव नंदकुमार कुलकर्णी पाहत आहेत.

ज्ञानेश्वर सालगुडे पाटील विविध कार्यकारी सेवा संस्थेची सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. एम. एल. शिंदे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा सदस्य यांची बिनविरोध निवड झालेली आहे. साधारण खातेदार कर्जदार गटात, सालगुडे पाटील नारायण ज्ञानेश्वर, काळे माणिक दिनकर, सुतार बाळकृष्ण उत्तम, कांबळे यशवंत पंढरीनाथ, जगताप नामदेव रामचंद्र, कचरे धनाजी शिवाजी, थोरात हरी कुंडलिक, शेंडगे मारुती यल्लाप्पा असे आठ सदस्य बिनविरोध झाले आहे.

महिला प्रतिनिधी गटात गुरव कुसुम गजानन, शेंडगे गिरजाबाई महादेव अशा दोन महिला सदस्य आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात ओवाळ नागनाथ सायबु, इतर मागास वर्गीय प्रवर्ग गटात काळेल तानाजी कुंडलिक, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग पालवे हनुमंत प्रभाकर असे तेरा सदस्य बिनविरोध निवडून आलेले होते. अध्यासी निवडणूक अधिकारी ए. एच. बोषीकर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करण्यात आल्या. चेअरमन पदासाठी नारायण ज्ञानेश्वर सालगुडे पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी तानाजी कुंडलीक काळेल दोघांचे एकमेव अर्ज आलेले असल्याने चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या बिनविरोध निवड जाहीर करण्यात आल्या. संस्थेचे सचिव नंदकुमार कुलकर्णी यांनी निवडणूक कामी मदत केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथील मोटर सायकलस्वार युवकांचा चार चाकी गाडीला वेळापूर येथे अपघात…
Next articleयुवा नेते सौरभ जाधव यांचे बंधू सागर जाधव यांच्या विवाह सोहळ्यास लोकप्रिय आ. रामभाऊ सातपुते यांची उपस्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here