सदाशिवनगर ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे कोविड 19 लसीकरण मोहीम बाजारतळ अंगणवाडी येथे घेण्यात आली.
यामध्ये 1 ला डोस 08, दुसरा डोस 44 तसेच बुस्टर डोस 01 असे एकूण 53 लसीकरण करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हा सरचिटणीस तथा कोविड योद्धा सोमनाथ भोसले, ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोंगळे सर, ग्रा.प. कर्मचारी प्रमोद दळवी, आरोग्य सेवक सुनील लोंढे, आरोग्य सेविका वंदना चंदेल, आशा सेविका स्वाती मोहिते, चांदणी मिसाळ, सुनिता कांबळे, दैवता भोडवे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng