सदाशिवनगर येथे रत्नत्रय पतसंस्थेचा १९ वा वर्धापन दिन साजरा

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर येथील रत्नत्रय पतसंस्थेचा १९ वा वर्धापन दिन रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल (दादा) दोशी यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन व सदाशिवनगर गावचे सरपंच विरकुमार (भैया) दोशी, व्हा. चेअरमन डॉ. निवास गांधी, कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी, संचालक संजय गांधी, रामदास गोपने, जगदीश राजमाने, अजय गांधी, सोमनाथ राऊत, अरुण धाईंजे, संचालिका सौ. अनिता दोशी, अनघा गांधी, तज्ञ संचालक सुरेशकाका कुलकर्णी, विलास साळुंखेे, सचिव ज्ञानेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पतसंस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रत्नत्रय संस्था ही १९ वा वर्धापन दिन साजरा करत आहे व आज ती २० व्या वर्षात पदार्पण करत असताना संस्थेने २० कोटींच्या ठेवींचा आकडा पार केलेला आहे. हा आकडा संस्थापक व संचालक मंडळावर सर्व ठेवीदार सभासदांनी दाखवलेला विश्वास आहे. आपली संस्था ही संपूर्ण संगणीकृत असून ऑनलाईन व्यवहार करीत आहे. सर्व सभासदांना एसएमएस उपलब्ध करून दिलेले आहेत. संस्थेमार्फत सभासदांना भारतात कुठे डीडी काढणे व आरटीजीएस व एनएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे तसेच लाईट बिल भरणे, सर्व वाहनांचा इन्शुरन्स, नवीन पासपोर्ट व पॅन कार्ड काढणे, तसेच क्यू आर कोड पेमेंट सिस्टीम अशा विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरविल्या असल्यामुळे सर्व सभासद समाधानी आहेत. या सर्व सेवेंमुळे संस्था सुरळीत चालू आहे.

यानंतर संस्थेचे संस्थापक अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले की, लवकरच आपली पतसंस्था ही स्वमालकीच्या जागेत भव्य अशी इमारत बांधत आहे. व यापेक्षाही चांगली सेवा सभासदांना देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे यावेळी ते म्हणाले. संस्थेचे तज्ञ संचालक सुरेश (काका) कुलकर्णी म्हणाले की, आपण मला पुढील पंचवार्षिक सालामध्ये तज्ञ संचालकाची संधी दिल्याबद्दल मी रत्नत्रय पतसंस्थेचा ऋणी आहे‌. अशाच पद्धतीने इथून पुढील काळात ही आम्ही सर्व संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी काम करण्यासाठी कायम तत्पर राहणार आहोत असे म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद भैया दोशी यांनी मानले तर सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे हेमंत कुलकर्णी, वैभव मोडासे, मंगेश जगताप, टी. डी. देशमुख, नीता रणवरे, विक्रम पालवे, युवराज वळकुंदे, रणजित गोरड व विकास रुपनवर यांनी काम पाहिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा……
Next articleमाळशिरस नगरपंचायतीच्या गटारीचे घाण पाणी संथ वाहते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरून….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here