सदाशिवनगर येथे वीरकुमार दोशी यांना थेट जनतेतील सरपंच पदासाठी वाढता पाठिंबा.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वीरकुमार दोशी थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात

सदाशिवनगर ( बारामती झटका )

सदाशिवनगर ता. माळशिरस या ग्रामपंचायतीची थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ग्रामविकास पॅनलचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार वीरकुमार दोशी यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

सदाशिवनगर गावामध्ये सामाजिक व राजकीय कार्यामध्ये अग्रेसर असणारे व ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वीरकुमार अनंतलाल दोशी यांना सर्व पॅनलच्या प्रमुखांनी थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उभे केलेले आहे. वीरकुमार दोशी यांचा सुसंस्कृत स्वभाव, सहकार्य करण्याची भावना व गावच्या विकासासाठी असणारी तळमळ यामुळे तरुण वर्गातून वीरकुमार यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. वीरकुमार दोशी यांनी जाहीरनाम्यामध्ये गावच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मुद्दे घेतलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सदाशिवनगरच्या गावठाणाचा विषय तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे विस्तारीकरण झालेले असल्याने आठवडा बाजारसाठी जागा उपलब्ध करून सुसज्ज असा बाजार भरवण्याचा मनोदय आहे.

गावातील महिला व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून शिक्षणापासून कोणी वंचित होऊ नये, अशीही त्यांची धारणा आहे. सुप्रसिद्ध व्यापारी अनंतलाल दोशी व प्रमोद भैया दोशी यांची मोलाची साथ मिळत आहे. पॅनलमधील सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करीत असल्याने व प्रत्येक वर्गातील मतदारांच्या भेटीगाठीने मतदारांचा वाढता पाठिंबा वीरकुमार दोशी यांना मिळत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या तयारीचा आढावा
Next articleराजेंद्र गुंड यांना साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय युवा पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here