सदाशिवनगर येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. सोलापूर, शाखा बँकेचा ५२ वा वर्धापन दिन साजरा

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. सोलापूर, शाखा बँकेचा ५२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील (काकासाहेब) यांच्या प्रतिमेचे पूजन रत्नत्रय परिवाराचे संस्थापक श्री. अनंतलाल (दादा) दोशी व सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन धर्मवीर सदाशिवराव माने पाटील बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. प्रतापराव सालगुडे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी वर्धापदिनानिमित्त रत्नत्रय पतसंस्थेच्या वतीने रोख रुपये २५ लाख ची मुदत ठेव करण्यात आली. या कार्यक्रमास सुभाष सुज्ञे, पानीव ॲग्रो मिल्क & प्रॉडक्ट्स कंपनी प्रा. लि. चे चेअरमन डॉ. हनुमंत सुळे पाटील, धर्मवीर स. मा. पा. बि. शे. सह. पतसंस्थेचे व्यवस्थापक मॅनेजर श्री. पवार साहेब, रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव श्री. ज्ञानेश राऊत, पानीव ॲग्रो मिल्क & प्रॉडक्ट्स कंपनी प्रा. लि. चे जनरल मॅनेजर. श्री. पानस्कर साहेब, श्री शंकर सहकारी कारखान्याचे श्री. मिसाळ साहेब, संभाजी सालगुडे पाटील, क. बा. पा. विद्यालय प्रशाला समितीचे सदस्य सागर उरवणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी श्री. यू. एस. भोसले साहेब, कॅशिअर श्री. विलास देशमुख, लिपिक सचिन कुलकर्णी व बँकेचे सर्व कर्मचारी, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमंडलिकवस्ती प्राथमिक शाळा गुणवत्तेत नंबर वन – शर्मिलावहिनी पवार
Next articleकुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा ‘सिकंदर’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here