सदाशिवनगर येथे ह.भ.प. अविनाश महाराज साळुंखे सादलगांवकर यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे मिल फोरमन स्व. मधुकर दत्तात्रय मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन

सदाशिवनगर (बारामती झटका)

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सेवा निवृत्त मिल फोरमन स्व.मधुकर दत्तात्रय मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. अविनाश महाराज साळुंखे सादलगांवकर यांचे सुश्राव्य किर्तन बुधवार दि. 17/08/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये शिवामृत भवन येथे होणार आहे. तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे श्रीमती सुमन मधुकर मोरे, सौ. सुनिता व श्री. संजय मधुकर मोरे, सौ. प्रतिभा व श्री. विजय मधुकर मोरे, सौ. जयश्री ज्ञानदेव पाचपुते कष्टी, सौ. राजश्री किसनराव काळे पाटील पानगाव, श्री. हिरालाल बाबुराव मोरे आणि समस्त मोरे परिवार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहून किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

मधुकर मोरे यांचा जन्म अकलूज येथे झालेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत 1965 साली सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर अकलूज येथे कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या सहकार्याने मिलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला अवजड पाईप उचलण्याचे काम केलेले होते. त्यानंतर अनुभव वाढत जाऊन मिलमधील माहिती जाणून घेतली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखाना खरेदी केल्यानंतर 1969 साली मिलमध्ये काम करण्यासाठी सदाशिवनगर कारखान्यात काम सुरू केले होते. मिलमध्ये काम करत मिल फोरमन पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. सन 2002 साली सेवानिवृत्त झाले होते.

मधुकर मोरे यांनी कारखान्यात काम करत असताना दुधाचा जोड व्यवसाय सुरू केलेला होता. सुरवातीस टेंभुर्णी येथील गायकवाड यांच्या घरात बहिण दिलेली होती. त्यांच्याकडे गिर गाय होती, त्या गाईस होस्टन जर्सी गायीचे इंजेक्शन दिले होते. सदर जर्सी गाय सन 1975 साली सदाशिवनगर येथे चालवत आणलेली होती. पुर्वीच्या काळी निरा नदीवर टेंभुर्णी अकलूज रोडवर पुल नव्हता. इंदापूरला जावावे लागणार होते, त्यामुळे गायीला होडीतून निरा नदी पार करून आणले होते. तरीसुद्धा एक मुक्काम वाटेत पडला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत दुध व्यवसाय सुरू केलेला होता. शिवामृत दुध संघाची सालगुडे पाटील यांच्याकडे डेअरी होती. एक वेळ सदाशिवनगर तर एक वेळ पुरंदावडे असे दुध घालून नौकरी करीत होते. मोहिते पाटील यांच्या परिवारातील विश्वासू व प्रामाणिक कामगार म्हणून नौकरी केली. तत्कालीन कार्यकारी संचालक आनंदराव माने यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते.

जर्सी गायांच्या माध्यमातून दुधाचा व्यवसाय एवढा केला की, मोरे मिस्त्री यांची दुसरी ओळख जर्सी गाय वाले म्हणून झाली‌. चार ते पाच गाया कायम होत्या. दुध डेअरीला घालण्यासाठी पळापळ होत होती, म्हणून तत्कालीन चेअरमन राजसिह मोहिते पाटील यांनी श्री शंकर दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित सदाशिवनगर या संस्थेची स्थापना करून दिली. संस्था व्यवस्थीत चालविली होती. सेवा निवृत्त व वयोमानानुसार संस्थेकडे दूर्लक्ष झालेले होते. संजय व विजय यांचे शिक्षण झाले होते. जयश्री व राजश्री यांची लग्न होऊन घरी गुण्यागोविंदाने नांदत होत्या. संजय यांनी डबघाईस आलेल्या दुथ संस्थेला ऊर्जितावस्था आणली आहे‌. शिवामृत संघामध्ये जास्तीत जास्त दुध घालणारे तीन चार नंबरवर संस्था आहे.

चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी संजय मोरे यांची तज्ञ संचालक म्हणून गेल्या पाच वर्षांत निवड केली होती. सर्व काही सुरळीत चालू असताना गेल्या वर्षी अचानक मोरे परिवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळावा, असे मधुकर मोरे यांच्या निधनामुळे झालेले होते. ईश्वर सत्तेपुढे काही चालत नाही, असे समजून दुःखातून सावरून प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या समवेत काम केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमंत्रण निमंत्रण दिले आहे. पुण्यस्मरण निमित्त एक प्रकारे सर्व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वांना आमंत्रण निमंत्रण दिलेले आहे.

नजर चुकीने आपणापर्यंत आमंत्रण व निमंत्रण मिळाले नाही तर हेच आमंत्रण व निमंत्रण समजून प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती, महाप्रसादाचे कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवामृत दूध संघाचे माजी संचालक संजय मोरे व समस्त मोरे परिवार यांचेकडून करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रसाद सातपुते यांची यिन केंद्रीय उद्योजक समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड
Next articleचि. आशिष कदम पाटील आणि चि.सौ.कां. कोमल जगताप यांचा शुभविवाह संपन्न होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here