थकीत शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे उपलब्ध होतील असे टप्प्या टप्प्याने देण्याचा शब्द दिला – जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री. शंकर सहकारी साखर कारखाना सुरू करीत असताना पहिल्याच बैठकांमध्ये पूर्वीच्या संचालक मंडळाचे थकीत एफ आर पी चे पैसे शेतकऱ्यांना देणार आहोत पहिल्या टप्प्यात 20 टक्के रक्कम दिलेली आहे उर्वरित रक्कम कारखान्याकडे पैशाची उपलब्धता होईल असे शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने सरसकट सभासद शेतकऱ्यांना दिले जातील असा शब्द सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी बेमुदत धरणे आंदोलन स्थळावरील व्यासपीठावर येऊन उपस्थितांना सांगितले
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी बांधव यांचे थकित एफ आर पी साठी बेमुदत धरणे आंदोलन गेली सतरा दिवस सुरु होते. कारखाना प्रशासन साखर सहसंचालक तहसीलदार यांच्या उपोषण कर्ते यांच्याशी वाटाघाटी झालेल्या होत्या मात्र तोडगा निघालेला नव्हता. ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी संचालक दत्तूकाका रणवरे,सुरेश पाटील, नारायण सालगुडे पाटील यांचे शिष्टमंडळ आंदोलन कर्ते यांच्याकडे पाठवून बैठकीचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे किशोर सुळ पाटील, एडवोकेट सोमनाथ वाघमोडे, मधुकर पाटील, अजित बोरकर, भानुदास सालगुडे पाटील, रमेश पाटील, बाजीराव माने, तुषार पाटील, सोमनाथ पिसे, दादासाहेब पालवे, आदींची शिष्टमंडळ कारखाना गेस्ट हाऊस येथे चर्चेसाठी रवाना झाले त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक बाबाराजे देशमुख, अर्जुनसिंह मोहिते पाटील, मामासाहेब पांढरे, यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते .कारखाना प्रशासन व आंदोलन कर्ते त्यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा होऊन सकारात्मक निर्णय झालेला होता कारखाना प्रशासन व आंदोलन कर्ते बेमुदत धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावर एकत्रित उपस्थित झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना भानुदास सालगुडे पाटील यांनी केली. कारखाना प्रशासनाच्यावतीने बैठकी मधील निर्णय जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित सर्व आंदोलन कर्ते शेतकरी सभासद यांच्यासमोर थकित एफ आर पी विषयी सांगितले आणि उपोषण सोडण्याची विनंती केली याच वेळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू होते ते किशोर सुळ पाटील यांनी बाळदादांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही उपोषण सोडत आहे शेतकऱ्यांचा समज झालेला होता ज्या शेतकऱ्यांनी या वर्षी ऊस घालणार आहेत त्यांनाच उर्वरित रक्कम दिली जाणार आहे मात्र सर्वांना राहिलेली रक्कम देणार असल्याचे सांगितले सकारात्मक बैठक झालेली आहे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये सर्व आंदोलन कर्ते सहकारी,पोलीस प्रशासन, स्थानिक नागरिक यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ संचालक बाबाराजे देशमुख, व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, अर्जुनसिंह मोहिते पाटील, मामासाहेब पांढरे, दत्तूकाका रणवरे, नारायण सालगुडे पाटील,संजय कोरडकर, मानसिंग मोहिते,सुरेश पाटील, सुरेश मोहिते, चंद्रकांत शिंदे, शिवाजी गोरे,किशोर सुळ पाटील, ॲड. सोमनाथ वाघमोडे,अजित बोरकर, मधुकर पाटील, जयवंतराव पालवे, भानुदास सालगुडे पाटील, रमेश पाटील, बाजीराव माने, शंकरराव उर्फ केपी काळे पाटील, अजय सकट,बाबासाहेब माने, शिवराज पुकळे, विकास देशमुख, सचिन रुपनवर, प्रताप पाटील ,सुनील पाटील समाधान काळे, तुषार पाटील, गणेश काटे, सोमनाथ पिसे, राहुल वाघमोडे, मच्छिंद्र गोरड सर, शामराव बंडगर, अरविंद भोसले, सोमनाथ भोसले, शिवाजी लवटे, दादा भांगे, राहुल सुळ,सुभाष आद्रट. आदी मान्यवर उपस्थित होते. माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक रत्न गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng