सदाशिवनगर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची मोळी गाळपासाठी जाणार का? वादाच्या भोवऱ्यात अडकणार ?

श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व पक्षीय व संघटना यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर.

माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांच्या सहभागाने माळशिरस तालुक्याचे राजकारण वेगळ्या वळणावर.

माळशिरस ( बारामती झटका )

श्री. शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर तालुका माळशिरस साखर कारखान्याचा अठ्ठेचाळीसावा गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. तर दुसरीकडे श्री शंकर सहकारी साखर कारखाना गाळप परवाना नसताना गाळप चालू करीत असल्याने कारखान्याचे कार्यकारी संचालक रवींद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर व माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक रत्न गायकवाड यांना माळशिरस तालुक्यातील राजकीय पक्ष व संघटना यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले सदरच्या वेळी मोहिते-पाटील गटाचे माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांचा सहभाग असल्याने माळशिरस तालुक्याचे राजकारण वेगळ्या वळणावर असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेले आहे.


श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याचा सीझन 21 22 ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील होते यावेळी उपस्थित राजसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, विद्यमान उपसभापती प्रतापराव पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब होले, शंकरराव मोहिते पाटील सूतगिरणीचे चेअरमन आप्पासाहेब काळे, संग्रामसिंह जागीरदार ,गणपतराव वाघमोडे शिवामृत चे व्हाईस चेअरमन सावता ढोपे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, सहकार महर्षी कारखान्याचे कार्यकारी संचालक चौगुले, श्री शंकर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविराज जगताप आदी मान्यवरांसह माळशिरस तालुक्यातील माजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य विविध गावचे सरपंच सभासद शेतकरी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.


माळशिरस तालुक्यातील विविध पक्ष व संघटना यांनी तहसीलदार माळशिरस व माळशिरस पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलेली आहे सदर निवेदनात श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचा अठ्ठेचाळीसावा गळीत हंगाम शुभारंभ 28 /10/ 20 21 रोजी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी आहे साखर आयुक्त पुणे साखर सहसंचालक सोलापूर यांचेकडून गळीत हंगाम परवाना घेतलेला नाही ही महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या या धोरणाच्या विरोधात या कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ कार्यकारी संचालक काम करीत आहेत.

केंद्र सरकारच्या शुगर कंट्रोल ॲक्ट 1966 व महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार कारखाना गाळप परवाना नसताना गाळप चालू करीत असेल त्या कारखान्याच्या कार्यकारी संचालक रवींद्र जगताप कारखान्याचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन दिलेले असून सदरच्या निवेदना सोबत माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर शिवाजीराव सुळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष अजित भारत बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शंकरनाना देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, राष्ट्रवादी ओबीसी तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे, श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, नीरा देवधर वंचित गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवराज पुकळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजिनाथ पालवे, राष्ट्रवादीचे महाळुंग श्रीपुर शहराध्यक्ष मारुती रेडे पाटील, स्वाभिमानी शेतकरी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित कोडग, युवा नेते विक्रमदादा सूळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे कायदेशीर सल्लागार सिताराम झंजे, रयत क्रांती युवक संघटना तालुका अध्यक्ष विष्णू गोरड, काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष साहिल आतार अशा वीस माळशिरस तालुक्यातील विविध पक्षाचे व संघटनेचे नेत्यांची नावे असलेले निवेदन देण्यात आले. त्यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे उपस्थीत होते.


सदाशिवनगर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची अनेक मान्यवरांच्या उपस्थित गळीत हंगामासाठी टाकलेली मोळी गाळपासाठी जाणार का ? सर्वपक्षीय व संघटनांनी दिलेल्या निवेदनामुळे कारवाई होऊन वादाच्या भोवऱ्यात मोळी अडकणार का ? याकडे राजकीय विश्लेषकांचे व साखर सम्राटांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleJust a moment .
Next articleलोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे कडून खंडकरी शेतकऱ्यांचे नेते स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या परिवारांची सांत्वन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here