सदाशिवनगर साखर कारखान्याच्या थकीत बिलाचे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र करणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यास कारखाना बंद पाडून आंदोलनाची तीव्रता वाढणार.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर ता. माळशिरस या कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ऊस गाळपासाठी आलेल्या थकीत ऊस बिल व कामगारांचा पगार आहे. यासाठी गेल्या आठ दिवसापासून मोहिते पाटील गटाचे माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय शेतकरी व सभासद त्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना गांधीगिरी मार्गाचे शेतकऱ्यांचे आंदोलन वीर भगतसिंग व सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गाने कारखाना बंद पाडून तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर यांचाही आंदोलनांमध्ये सहभाग होता. कारखाना प्रशासनाकडून अद्याप निर्णय न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन उडी घेतलेली असल्याने आंदोलनाला वेगळी दिशा मिळणार आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर यांची भूमिका भेटीअंती समजणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसमीर वानखेडे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकवर्गात समाधानाचे वातावरण
Next articleअठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here