सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर ता. माळशिरस या साखर कारखान्यावर गाळपासाठी शेतकरी सभासदांनी घातलेल्या उसाचे थकीत बिल व कामगारांनी काम केलेल्या पगाराचे पैसे कारखाना प्रशासनाने दिलेले नसल्याने मोहिते-पाटील गटाचे माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय व शेतकरी संघटना ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कामगार यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. उपोषण स्थळी किर्तन, भजन, जागरण गोंधळ असे कार्यक्रम करण्यात येत आहेत. उद्या शुक्रवार दि. १९.११.२०२१ रोजी उपोषणास दहा दिवस पूर्ण होत आहेत. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. कारखाना प्रशासकाचा निषेध म्हणून आंदोलन कर्ते मुंडन करून प्रशासनाचा प्रतीकात्मक निषेध करणार असल्याचे कुपोषण स्थळावर चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng