सदाशिवनगर साखर कारखान्याचे प्रशासन व उपोषण कर्ते शेतकरी यांच्यात बैठक सुरू.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर तालुका माळशिरस येथे गेल्या सतरा दिवसापासून थकीत ऊस बिलासाठी आंदोलन कारखाना स्थळावर सुरू होते आज कारखाना प्रशासन व उपोषण कर्ते शेतकरी बांधव यांच्यामध्ये कारखान्याच्या शासकीय विश्रामगृहात बैठक सुरू आहे.
सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते पाटील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे संचालक मंडळ यांच्यासोबत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू आहे ते माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, लोणंद फलटण रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते एडवोकेट सोमनाथ वाघमोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, रमेश पाटील, बाजीराव माने, सोमनाथ पिसे, गणेश काटे, तुषार पाटील आदी उपोषण कर्ते यांच्यासमवेत बैठक सुरू आहे. बैठकीनंतर अंतर्गत चर्चा बाहेर येणार आहे, तोपर्यंत कारखाना स्थळांवर उपोषण सुरू राहणार का सुटणार याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleखुडूस येथे संविधान दिन उत्साहात साजरा
Next articleसोळा लाख फसवणूक प्रकरणी मुकादम पती-पत्नी दोघांविरोधात वाहन मालकांचा गुन्हा दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here