पिलीव (बारामती झटका)
सद्गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांचे परमशिष्य व ऊस उत्पादक सभासदांचे हित जोपासत सामाजिक धार्मिक क्षेत्राशी निगडित राहुन महात्मा गांधी व गाडगेबाबांनी शहराकडून खेड्याकडे चला हा दिलेला संदेश सद्गुरु श्री श्री रविशंकरजी यांनी’ दि आर्ट ऑफ लिविंग’ च्या माध्यमातून जीवन जगण्याची कला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व मानव जातीला धकाधकीच्या काळात निरोगी जीवन जगण्यासाठी जोपासली पाहिजे. हा संदेश पुण्यापासून ते राजेवाडीच्या माळरानावरती आपल्या सद्गुरु परिवारातील असंख्य सवंगड्यांना घेऊन सदगुरु श्री श्री साखर कारखाना श्री श्रीनगर राजेवाडीच्या माध्यमातून “सेवा निसर्गाची, उन्नती आपली” या ध्येयाने प्रेरित होऊन निसर्गप्रेमी चेअरमन एन. शेषागिरीराव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सभासद, कामगार आणि आटपाडी, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माण, इंदापूर या ठिकाणच्या स्नेही मंडळींनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून चेअरमन यांचा नकार असतानादेखील मा. बाळासो कर्णवर पाटील, व्हाईस चेअरमन संचालक मोहन बागल, जनरल मॅनेजर के. एल. पाल, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर सूर्यतेजा नारा, डीजीएम शहाजी पाटील, एचईओ अण्णासो शेंडे, एचआर एडमिन समीर सय्यद, सचिन खटके, डीसलरी मॅनेजर लालासो पाटील, केन मॅनेजर कल्याण पताळे, सुनील सावंत, सुरक्षा अधिकारी मल्हारी सावंत, राममोहन, शेती अधिकारी दत्ता क्षीरसागर, तानाजीराव देवकते, अवधूत जमदाडे सर्व खाते प्रमुख राजेवाडी, हिंगणी, बचेरी, इटकी, दिघंजी, पिलीव येथील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अंतकरणपूर्वक साजरा करून शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचे कार्यक्रम झाले. चेअरमन एन. शेषागिरीराव यांनी धन्यवाद देऊन निरोगी जगा नैसर्गिक शेतीवर भर द्या असा संदेश दिला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng