सद्गुरु श्री.श्री.चा ऊस गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात संपन्न; 2660 एफआरपी जाहीर

पिलीव (बारामती झटका रघुनाथ देवकर यांजकडून)

सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर राजेवाडी या ठिकाणी नऊ वर्षापासून शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक, व ग्रामीण भागासाठी विकासात्मक दृष्टिकोनातून वरदायिनी ठरलेल्या सद्गुरु श्री श्री सा का चा १० वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभाचा कार्यक्रम चेअरमन एन शेशागिरी राव , व्हाईस चेअरमन बाळासो कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली एच आर व ऍडमिन मॅनेजर समीर सय्यद, असिस्टंट एच आर ऍडमिन मॅनेजर सचिन खटके यांनी आयोजित केला होता. प्रथमत कारखान्याचे सी एफ ओ श्री व सौ रोहित नारा या उभयतांचे हस्ते चंडीहोम तर श्री व सौ के एच पताळे(केन मॅनेजर) यांचे हस्ते सत्यनारायणाची पूजा करून श्री गोपीचंद पडळकर ( विधानपरिषद सदस्य व प्रवक्ते भाजपा) प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज,गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज व चेअरमन शेशागिरी राव, बाळासाहेब कर्णवर पाटील संचालक उदय जाधव, श्रावण वाक्षे ,मोहन बागल, विजय मारकड ,ए.जी राव, सौ श्रीदेवी राव,सौ विशाखा नारा, जयवंतराव सरगर (सभापती आटपाडी) व जनरल मॅनेजर मोहनलाल पाल ,सर्व खाते प्रमुख कर्मचारी व कामगारांचे उपस्थितीत मोळी पूजनाचा कार्यक्रम संपन्न करून सभेच्या मुख्य कार्यक्रमास मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात केली गेली.

प्रास्ताविकातून संचालक उदय जाधव यांनी कारखान्याच्या प्रगतीचा यशस्वी आलेख मांडला तर श्रावण वाक्षे यांनी कारखान्याबाबत अडचणींवर कशी मात केली हे सांगितले मा चेअरमन शेशागिरी राव व व्हाईस चेअरमन बाळासो कर्णवर पाटील यांनी शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांना दिलासादायक व अंतर्गत भुईमुगाचे पीक घ्या व ते घेण्याची हमी देऊन नैसर्गिक शेतीचे महत्त्व सांगून विषमुक्त अन्न सेवन करण्याचा सल्ला देऊन चालू वर्षीच्या उसाला एफआरपी रक्कम 2660 जाहीर करून उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. यावेळी कांतीलाल नाईकनवरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

गुरु प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज, गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचन झाल्यावर अध्यक्षीय भाषणात मा.आ. गोपीचंद पडळकर यांनी कारखान्याच्या कारभाराबद्दल प्रशंसनीय उद्गार काढून मला शक्य ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले यावेळी राजेवाडी चे सरपंच पांडुरंग कोडलकर, बचेरी चे सरपंच महादेव पाटील तसेच इटकी, गुळवे वाडी बचेरी ,शिंगोर्णी, हिंगणी आदी गावचे सरपंच व विविध पदाधिकारी , तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी वर्ग, कामगार उपस्थित होते. सदर प्रसंगी रोहित नारा यांची वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन च्या (विस्मा) च्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सर्व उपस्थितांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर ह भ प हरिहर नंदन महाराज यांचा संदेश वाचून शहाजी पाटील यांनी आभार मानले तर एस सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराम यांनी आमदार नसताना दिलेले वचन आमदार झाल्यानंतर पूर्ण केल्याने एक वचनी रामाचा प्रत्यय आला.
Next articleशिक्षक समिती मंगळवेढा व सांगोला शाखा संवाद बैठका संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here