आ. अनिलभाऊ बाबर आणि विधान परिषद सदस्य आ. गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते हंगामाचा शुभारंभ
राजेवाडी (बारामती झटका)
राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लिमिटेड २०२१-२२ चा १० व्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर आणि विधान परिषद सदस्य व भाजपा प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी संपन्न होणार आहे.
सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा शुभारंभ श्री. ष. ब्र. १०८ गुरु प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज माढा, गुरूभक्तीभूषण हरिहरनंदन महाराज हरिहर भक्तीपीठ पिलीव, श्री. ष. ब्र. वेदांताचार्य १०८ गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज वेळापूर, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर मा. अध्यक्ष संत तुकाराम संस्थान देहू यांच्या शुभाशीर्वादाने होणार आहे. या गाळप हंगामास उपस्थित राहण्याचे आवाहन व्हा. चेअरमन बाळासो कर्णवर पाटील आणि चेअरमन तथा कार्यकारी संचालक एन. शेषागिरीराव तसेच सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद, अधिकारी कर्मचारी व कामगार वृंद यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng