सद्गुरू कारखाना राजेवाडी, दोन टनाची काटामारी उघड रंगेहाथ पकडली चोरी,

कारवाई करा अन्यथा, कारखान्यावर मोर्चा काढण्याचा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा इशारा.

माळशिरस ( बारामती झटका )

आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील सद्गुरू श्री श्री रविशंकर साखर कारखान्याच्या वजनात दोन टनाची काटामारी सुरू असून ती रंगेहाथ पकडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळशिरस तालुक्यातील मळोली येथील शेतकरी रणजित माने यांनी सद्गुरू कारखान्याला ऊस पाठविला‌, त्यावेळी वजनात फरक आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जाणाऱ्या ट्रॅक्टरचे उसासहित वजन जयमल्हार वजन काटा तांदुळवाडी येथे केले. त्यावेळी वजन 24 टन 900 किलो असे आले. त्याच ट्रॅक्टरचे कारखान्याचे काट्यावर वजन 22 टन 100 किलो आले. याचाच अर्थ 2 टन 800 किलोचा फरक आला. आहे तर तिसऱ्या दिवशी जाणाऱ्या वाहनांची वजने केली असता खाजगी काट्यावर 22 टन वजन आले तर कारखान्याच्या काट्यावर 20 टन वजन आले. याचाच अर्थ दोन टन वजनाचा फरक पडला. एकदरित या कारखान्याच्या वजनात दोन ते अडीच टनाचा काटा मारला जातो हे स्पष्ट होते. त्यामुळे सदर रणजित माने या शेतकऱ्याच्या उसाचे वजन योग्य ते गृहीत धरून बिल काढावे.

मात्र आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यात गाळप झाला आहे, त्या सर्वाचे वजन दोन टनानी वाढवून बिल काढली पाहिजेत. अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढू, असा इशारा खराडे यांनी दिला आहे. यावेळी संजय बेले, संदीप शिरोते, दीपक मगदूम, सोलापुर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, ॲड. विजय रणदिवे, अजित बोरकर, कमलाकर माने देशमुख, सचिन पाटील, मदन जाधव, भागवत जाधव, भुजंग पाटील, प्रकाश साळुंखे, गुलाब यादव आदी पदाधिकारीसह शेतकरी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथे करे हॉस्पिटल बाल रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दिमाखात संपन्न.
Next articleदहीगाव विकास सेवा सोसायटीवर मोहिते-पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व. विरोधकांचा सुपडासाफ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here