सभासदांचे हित जोपासून संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी – बाबासाहेब माने

गोरडवाडी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन सोमनाथ साधू कोकरे व व्हाईस चेअरमन चंद्राबाई माणिक पिंगळे यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्यावतीने सन्मान

माळशिरस ( बारामती झटका )

गोरडवाडी विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचीसुद्धा निवडणूक बिनविरोध झालेली आहे. संस्थेचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सभासदांचे हित जोपासून संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करून नावलौकिक वाढवावा, असे मौलिक विचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी सोमनाथ साधू कोकरे व व्हाईस चेअरमन पदी चंद्राबाई माणिक पिंगळे यांची निवड झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलताना सांगितले. यावेळी माजी सरपंच भिकू गोरड, नानासो हुलगे, विद्यमान सरपंच विजयराव गोरड, यशवंत गोरड, माजी सरपंच बाळू गोरड, दादासो गोरड, माजी चेअरमन खंडूतात्या पवार, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंगतात्या पिसे, माणिक कोकरे, युवराज पिंगळे, धोंडीबा कोकरे, बाळासाहेब नरळे, किसन कर्णवर, लक्ष्मण कर्णवर, भारत राघू गोरड, सिकंदरभाई, नवनाथ केंगार, अविनाश कळसुले आदी मान्यवरांसह संस्थेचे संचालक सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोरडवाडी ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जी. बी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाची बैठक आयोजित केलेली होती. सर्व संचालकांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी चिट्टीचा वापर करून चेअरमन पदासाठी सोमनाथ साधू कोकरे आणि व्हाईस चेअरमन पदासाठी चंद्राबाई माणिक पिंगळे यांची नावे जाहीर करून दोघांचे उमेदवारी अर्ज भरले होते. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाचे एकमेव अर्ज आलेले असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जी. बी. जाधव यांनी बिनविरोध चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर केल्या. संस्थेचे सचिव कुलकर्णी व क्लार्क तुकाराम पिंगळे यांनी सहकार्य केले.

गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे तेरा सदस्य बिनविरोध झालेले होते. सर्वसाधारण कर्जदार गटात तुकाराम ज्ञानोबा गोरड, शामराव नाना हुलगे, सोमनाथ साधू कोकरे, भारत गुलाब गोरड, लक्ष्मण जगन्नाथ गोरड, येदु श्रीमंत गोरड, दत्‍तू रामा कोळेकर, सुरेश तात्या गोरड तर महिला प्रतिनिधी गटात बाळाबाई विष्णू यमगर, चंद्राबाई माणिक पिंगळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात मच्छिंद्र माणिकराव कर्णवर, अनुसूचित जाती जमाती गटात दादा बाबा वायदंडे, इतर मागास प्रवर्ग गटात सुनील लक्ष्मण पोरे असे बिनविरोध सदस्य झालेले होते.


गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुक बिनविरोध करण्यात भिकाजी गोरड, नानासाहेब हुलगे, यशवंत गोरड, बाळासाहेब कर्णवर, लक्ष्मण गोरड, बापू गोरड, शंकर यमगर, हनुमंत गोरड, विजय गोरड, बाळासाहेब गोरड, कांतीलाल लवटे, पांडुरंग पिसे, विष्णूभाऊ गोरड, रामा गोरड, अजित कर्णवर, धुळा गोरड आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले होते.


सेवा सोसायटीची संचालक मंडळाची बिनविरोध निवड करून चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड सुद्धा बिनविरोध झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण केली. नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांचा सन्मान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी सत्कार करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनेफडो विकास संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
Next articleमाळशिरस पंचायत समिती येथे शिव स्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here