जालिंदरभाऊ यांनी दुसऱ्याची घरे बांधत असताना स्वत:च्या घराचा पाया भक्कम करून कळस गाठला.
अकलूज ( बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील बांधकाम व्यावसायिक स्वर्गीय जालींदर मारूती डांगे उर्फ भाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प. कुरळे महाराज यांचे गुरुवार दि. 28/04/2022 रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत सुर्यकांत निवास विजय वसाहत ( शिक्षक काॅलनी) यशवंतनगर येथे सुश्राव्य किर्तन होणार आहे. तरी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांनी किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वानी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहावे असे, श्रीमती निर्मला जालींदर डांगे, सौ.शुभांगी व श्री. सचीन जालींदर डांगे, सौ. संध्याराणी व श्री. सुर्यकांत जालींदर डांगे, सौ.वर्षाराणी व श्री. प्रमोद वसंत भोसले आणि समस्त डांगे परिवार यांचेकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.
जालींदरभाऊ यांनी कष्टातून दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला होता. प्रामाणीकपणे बांधकाम व्यावसाय करून अनेक लोकांची घरे बांधत असताना स्वत:च्या घराचा पाया भक्कम करून कळस गाठला होता. त्यांना धर्मपत्नी निर्मला यांची प्रतीकुल परिस्थीतीत चांगली साथ मिळालेली होती. उभय पतीपत्नी दोघांचाही सहभाग मुलांवर संस्कार करण्यात होता. मुलांनी आईवडील यांनी घालून दिलेले संस्कार व आदर्श डोळ्यासमोर ठेवून उद्योग व्यवसायात यशस्वी भरारी घेतलेली होती. सर्वकाही सुरळीत चालू होते. अचानक काळाने घाला घातला आणि डांगे परिवारातील कळस कोलमडून पडला. दुःखाचा डोंगर कोसळला होता.. काळ आणि वेळ थांबत नाही. बघता बघता वर्ष होत आले तरीसुद्धा भाऊंच्या आठवणीने वर्षातील एक सुध्दा गेलेला नाही. कायम भाऊ डांगे परिवारातील सदस्यांच्या स्मरणात राहिलेले आहेत.

कष्टाने केली आयुष्याची सुरुवात,
सगळ्यावर ठेवला मायेचा हात,
सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ,
जन्मोजन्मी पाहतो आम्ही तुमचीच वाट,
पवित्र तुमची स्मृती अनंत तुमची माया,
नित्य असू द्या आमच्यावरती अखंड तुमची छाया,
भाऊ तुमच्या छायेविना सर्वकाही वाटे अपूर्ण,
कोणत्याही धन-संपत्तीने उणीव न होई पूर्ण,
चेहरा होता हसतमुख कधी न दिले कोणास दुःख,
मनी होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा,
तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं,
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
फक्त तुम्ही नसल्याची मोठी उणीव आहे,
अजूनही होतो भास तुम्ही आहात जवळपास,
काटे फिरुनी घड्याळ्याचे, कसा घेऊ मागे क्षण,
कष्टातून संसार फुलवला उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणाक्षणाला आजही तुमची वाट पाहतो,
भाऊ यावे तुम्ही पुन्हा जन्माला,
शांती लाभो तुमच्या पवित्र आत्म्यास हीच प्रार्थना गुरु दत्तात्रेयास…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng