माळशिरसमधील वस्ताद बाजीराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण ( वर्षश्राद्ध ) निमित्त पुष्पवृष्टी व कीर्तनाचा कार्यक्रम.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील वस्ताद बाजीराव बाबासो देशमुख यांचे शनिवार दि. ०४/१२/२०२१ प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्रद्ध) निमित्त समाज प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठारे कर्जतकर यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत ६१ फाटा माळशिरस येथे होणार आहे. दु. १२ वाजता प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

माळशिरस शहरात अनेक महान मल्ल होऊन गेले त्यापैकी बाजीराव देशमुख हे एक होते. माळशिरसकरांनी पूर्वीपासून कुस्तीचा छंद जोपासलेला आहे. स्व.बाजीराव देशमुख यांनी अनेक कुस्ती मैदानामध्ये आपले नाव कमावलेले होते. प्रतिकूल परिस्थितीत कुस्ती वाढविण्याचे काम बाजीराव देशमुख यांनी केलेले होते. त्यांनी अनेक महान मल्ल घडवलेले आहेत. माळशिरसमधील कुस्ती आखाड्याचे वस्ताद म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेले होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव वस्ताद विजय देशमुख हे काम पाहत आहेत. बाजीराव देशमुख यांना सुरेखा व द्रौपदी अशा पत्नी आहेत. त्यापैकी द्रोपदी देशमुख माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावर कार्यरत आहेत. स्वर्गीय बाजीराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थितत राहावे, असे आवाहन देशमुख परिवार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng