शामराव बंडगर यांना ईगल फौन्डेशनचा राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार २०२१ जाहीर…
तिरवंडी (बारामती झटका)
आधुनिकतेच्या झगमगाटात संपत्तीच्या मखमलीवरती लोळणारेच फक्त राजकीय मक्तेदारी निर्माण करतात या नियमाला धाब्यावर बसवून प्रामाणिकपणे समाजमनाशी नाळ जोडूनसुद्धा इतिहासाला गवसणी घालणारे समाजप्रिय व्यक्ती म्हणजे तिरवंडी ग्रामपंचायत सदस्य समाजसेवक शामराव बलभिम बंडगर. यांचा जीवनप्रवास तरूण पीढीसाठी एक दीपस्तंभ ठरेल. त्यांनी केलेल्या या अतुलनीय सामाजिक कार्यामुळे त्यांना ईगल फौन्डेशनच्या वतीने राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार २०२१ देण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्यावर तीरवंडी परिसरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शामराव बंडगर यांचे प्राथमिक शिक्षण त्यांची मायभूमी तिरवंडी या खेडेगावात झाले. तसेच माध्यमिक शिक्षण माळशिरस येथे झाले. आणि महाविद्यालयीन शिक्षण अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात झाले. शैक्षणिक वाटचाल करताना त्यांन खूप वाईट अनुभव आले त्यामुळे व्यावसायिक शिक्षण बाजुला राहीले, पण चळवळीचे मनाने त्यांना शांत बसु दिले नाही. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नासाठी नेतृत्व करता करता राजकीय प्रवास करत ग्रामपंचायत सदस्य ते काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी यशस्वी नेतृत्व केले.

वयाच्या १६व्या वर्षापासून सामाजिक विकासाचे व्रत हाती घेवून ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपूले || या संतवचनाप्रमाणे निस्वार्थी भावनेने गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकत्व घेवून त्यांचे सर्व शैक्षणिक आयुष्य जपण्यासाठी मदत केली. आधार व स्पंदन या समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायकल, प्रवासी पास, शैक्षणिक साहित्य वाटप यासाठी आर्थिक दायीत्व पत्करले. स्वतःचे शैक्षणिक नुकसान हलाखीच्या परिस्थितीमुळे झाले, मात्र ही वेळ नंतर कोणावर येवू न देण्याचा मानस घेवून सामाजिक ध्येयाने झपाटलेले शामराव बंडगर हे कार्य करत राहिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng